आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅरालिम्पिक:काेणतेही पदक ही माझ्यासाठी सर्वात माेठी कामगिरी नाही, पॅरा स्पाेर्ट‌्ससाठी केलेली जागृती हेच उल्लेखनीय यश : दीपा 

चंदिगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मदर्स डे मुलींसाेबत साजरा करताना दीपा मलिक. - Divya Marathi
मदर्स डे मुलींसाेबत साजरा करताना दीपा मलिक.
  • रिआे पॅरालिम्पिकच्या पदकविजेत्या दीपा मलिकची वयाच्या ४९ व्या वर्षी निवृत्ती

गौरव मारवाह 

आतापर्यंत जागतिक स्पर्धेत जिंकलेली पदके ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची कामगिरी ठरत नाही. त्यापेक्षा मी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पॅरा स्पाेर्ट‌‌्सला वेगळी आेळख मिळवून दिली. या पॅरा स्पाेर्ट‌‌्समधील जागृती हेच माझ्यासाठी सर्वात माेठे यश आहे, अशा शब्दांत रिओ पॅरालिम्पिकमधील पदकविजेत्या दीपा मलिकने निवृत्तीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. शरीराने साथ दिल्यास २०२२ एशियन स्पर्धेत कमबॅक करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

निवृत्तीचा निर्णय सर्वांसाठी धक्का देणारा. याबाबत आपले काय मत? 

मला नाही वाटत, हा निर्णय सर्वांना आश्चर्याचा असेल. मी हे सप्टेंबर महिन्यात जाहीर करणार हाेते. संघटनेची जबाबदारी आल्यामुळेच मला हा निर्णय आता लवकर घ्यावा लागला. आता नेतृत्वात चांगली कामगिरी करता येईल, असे माझे मत आहे. 

अध्यक्षाच्या भूमिकेत आता तुमची भविष्यातील माेठी याेजना काेणती?
 संघटनेला क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत अशी मान्यता मिळवून देण्याचे माझे सर्वात पहिले लक्ष्य आहे. त्यामुळे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हेच माझ्यासाठीचे माेठे कार्य आहे. त्यासाठीच मी संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. पदक जिंकून मी देशाची सेवा केली आहे. हेच कार्य महत्त्वाचे आहे.

पॅरा स्पाेर्ट‌‌्सला चालना मिळावी, यासाठी दीपाने आपल्या व्हील्सना ब्रेक लावला, असे आहे का?
हा काेणताही त्याग नाही. मी सध्या ५० वर्षांची झाले आहे. त्यामुळे या आतापर्यंतच्या प्रवासाचा सर्वात माेठा अनुभव हा पॅरा स्पाेर्ट‌्सच्या प्रगतीसाठी हाेऊ शकताे. त्याचाच मी विचार केला. याच विचाराने मी निर्णय घेतला आहे. मी सध्या ड्यूटीवर लक्ष देत आहे. सर्व काही ठीक असताना याशिवाय शरीराने जर साथ दिली तर, मी २०२२ मध्ये हाेणाऱ्या एशियन गेम्सदरम्यान पुनरागमन करू शकेन. हा निर्णयही मी त्यादरम्यानच्या परिस्थिती पाहून घेणार आहे. अद्याप याबाबत ठाम नाही. त्यामुळे हा निर्णय सर्वांसाठी अधिकच फायदेशीर ठरेल. मी सराव सातत्याने करणार आहे.

करिअरकडे कसे पाहत आहात ?

प्रामाणिकपणे आतापर्यंत आपल्या खेळात महत्त्वाचे याेगदान देत आले आहे. निश्चित केलेल्या ध्येयाला गाठण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिले. ते पदकाच्या रूपाने मला मिळत गेले. काेणत्याही चाहत्याची निराशा हाेऊ नये, हाच माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहिला. हे सर्व मी पाळत करिअर घडवले.

करिअरमधील आतापर्यंतची सर्वात माेठी कामगिरी काेणती? 

सर्वात माेठी कामगिरी पदकांनी माेजत नाही. पॅरा स्पाेर्ट‌‌्समध्ये घडून आलेली जागृती हेच माझ्यासाठीचे आतापर्यंतचे सर्वात माेठे यश आहे. हीच मी उल्लेखनीय कामगिरी मानत आहे. दीपा मलिक हे नाव घेतल्यानंतर लगेच डाेळ्यासमाेर पॅरा स्पाेर्ट‌‌्स उभे राहते, हेच माेठे यश माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

कुटुंबीयांची करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका राहिली, त्यांच्याबद्दल मत?

पदक जिंकण्याचे स्वप्न हे आपले स्वत:चेच मर्यादित नसते. हेच स्वप्न संघातील आणि कुटुंबीयांतील सर्वच जण पाहतात. यात काेच, फिटनेस, जिम ट्रेनर, न्यूट्रिशियनिस्ट, सपाेर्ट स्टाफचा समावेश असताे. याशिवाय या यशात मला कुटुंबीयांतील सर्वांचेच वेळाेवेळी माेलाचे सहकार्य लाभले. त्यांची मी ऋणी आहे. 

सर्वात कठीण रॅलीत सहभागाने मिळवली आेळख

- पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. तिने २०१६ मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत राैप्यपदक जिंकले हाेते.  

- खेलरत्न (२०१९) विजेती पहिली दिव्यांग महिला खेळाडू. 

- भालाफेकच्या  एफ-५३ गटात  जगात नंबर वन महिला खेळाडू. 

- २०१२ मध्ये अर्जुन, २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराची मानकरी.    

- मोटर स्पोर्ट‌्स क्लब ऑफ इंडिया यांचे अधिकृत रॅली लायसन्स मिळवणारी देशात पहिली दिव्यांग 

- देशातील सर्वात कठीण कार रॅली रेड द हिमालया आणि डेझर्ट स्टॉर्म स्पर्धेतही सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...