आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन वेल्स टेनिस स्‍पर्धा:नदाल फायनलमध्ये; कार्लोसने 192 मिनिटे झुंजवले

इंडियन वेल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नंबर वन राफेल नदालने यंदाच्या सत्रात २० वा विजय साजरा केला. त्याने रविवारी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्याने एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये स्पेनच्या १८ वर्षीय कार्लाेस अल्कारेजला ६-४, ४-६, ६-३ ने पराभूत केले. यासाठी त्याला स्पेनच्या युवा खेळाडूने तब्बल १९२ मिनिटे झुंजवले. यासह त्याने पाचव्यांदा या स्पर्धेची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला.

नदालचा अंतिम सामना फ्रिट््जशी होणार आहे. स्पेनच्या कार्लाेसने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करताना दुसरा सेट जिंकला. यासह त्याने सामन्यात बराेबरी साधली होती. मात्र, त्यानंतर त्याला ही लय कायम ठेवता आली नाही. १७ वर्षांनी मोठ्या असलेल्या नदालने तिसरा सेट जिंकून १८ वर्षी कार्लाेसला पराभूत केले.

बातम्या आणखी आहेत...