आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस ओपन:नदालची हार, मिळेल नवा विजेता, अमेरिकेच्या फ्रांसिस तियाफोकडून पराभूत

क्रिस्टाेफर क्लेरी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२ वेळा ग्रॅन्ड स्लॅमचा विजेता राफेल नदालला यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. ३६ वर्षी नदालचा या वर्षातील हा पहिलाच पराभव. द्वितीय मानांकित नदालला अमेरिकेच्या २४ वर्षीय फ्रांसिस तियाफाे याने चार सेटमध्ये (६-४, ४-६, ६-४, ६-३) हरविले. तीन तास ३४ मिनिटे चाललेला हा सामना खूपच रोमांचक झाला. नदाल आणि तियाफाे तिसऱ्यांदा समाेरासमाेर आले हाेते. तियाफाेची नदालवर हा पहिलाच विजय ठरला.

प्रथम मानांकित स्वातेक पहिलासेट गमावल्यानंतर जिंकली, पुढील फेरीत दाेन वेळची ग्रॅन्ड स्लॅम विजेती इगा स्वातेक पहिल्यांदाच यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पाेहाेचली. प्रथम मानांकित स्वातेक पहिला सेट पराभूत झाल्यानंतरही जर्मनीच्या ज्यूल निमियरला तीन सेटमध्ये (२-६, ६-४, ६-०) पराभूत केले. तिचा उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुला बराेबर सामना रंगणार आहे. पेगुलाने चेक रिपब्लिकच्या पेत्रा क्विताेवाला ६-३, ६-२ असे हरविले हाेते. आर्यना सबालेंका हिने अमेरिकेच्या डेनियल काेलेंसला ३-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले. चेक रिपब्लिकच्या कैराेलिना प्लिसकाेवाने बेलारुसच्या विक्टाेरिया अजारेंकाला ७-५, ६-७, ६-२ असे पराभूत करत उपांत्य फेरीत जाग मिळविली हाेती.

बातम्या आणखी आहेत...