आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी नंबर वन राफेल नदालने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना १४ व्यांदा क्ले कोर्टवर ग्रँडस्लॅम चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. त्याने रविवारी सत्रातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला.
पाचव्या मानांकित नदालने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये नॉर्वेच्या युवा टेनिसपटू कॅस्पर रुडचा पराभव केला. त्याने ६-३, ६-३, ६-० अशा फरकाने एकतर्फी विजय साजरा केला. यासह आता नदालच्या नावे विक्रमी २२ व्या ग्रँडस्लॅमची नाेंद झाली. यादरम्यान तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा जगातील पहिलाच टेनिसपटू ठरला. स्विस किंग राॅजर फेडरर आणि नंबर वन नाेवाक योकोविकच्या नावे प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम किताबाची नाेंद आहे. स्पेनच्या नदालने उपांत्यपूर्व लढतीत योकोविकचा पराभव करून सेमीफायनल गाठली होती. त्यानंतर त्याने हीच लय कायम ठेवताना आता फायनलही जिंकली. त्यामुळे त्याला दबदबा कायम ठेवता आला. या फायनलमध्ये रुडला नदालच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाली नाही.
फायनल गाठताच चॅम्पियनची मोहिम कायम
नदालने फायनल गाठताच चॅम्पियन होण्याची आपली मोहिम १४ व्यांदाही कायम ठेवली. त्याने २००५ मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी किताब पटकावला होता.त्यानंतर २००८ पर्यंत सलग चार, २०१० ते २०१४ दरम्यान सलग पाच, २०१७ ते २०२० दरम्यान सलग तीन वेळा किताब पटकावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.