आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पोर्ट्स:नेपोलीने ६ सत्रांनंतर पहिल्यांदा जिंकली मेजर ट्रॉफी, चाहत्यांचा रस्त्यावर जल्लोष

रोम10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिटी, आर्सेनलचे खेळाडू वर्णभेदविरुद्ध लिहिलेली जर्सी घालून मैदानावर!

रोम इटलीचा फुटबॉल क्लब नेपोलीने सहाव्यांदा कोपा इटालिया किताब जिंकला. त्यांनी फायनलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोची टीम युवेंट्सला पेनल्टी शूटआऊटवर ४-२ ने हरवले. विना चाहत्यांच्या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. नेपोलीने ६ सत्रांनंतर पहिल्यांदा कोणती मेजर ट्रॉफी जिंकली. नेपोलीच्या विजयानंतर त्याच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. या सामन्यांचे ५ महाद्वीपच्या २०० पेक्षा अधिक देशांत थेट प्रक्षेपण करण्यात आले.

सिटी, आर्सेनलचे खेळाडू वर्णभेदविरुद्ध लिहिलेली जर्सी घालून मैदानावर! मँचेस्टर| जगातील सर्वात मोठी फुटबॉल लीग “इंग्लिश प्रीमियर लीग’ चे १०० दिवसांनी पुनरागमन झाले. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने अार्सेनलला ३-० ने हरवले तर, शेफिल्ड युनायटेड व एस्टन विला सामना ०-० ने बरोबरीत सुटला. सध्याचा चॅम्पियन मँचेस्टर सिटीकडून रहीम स्टर्लिंगने ४५+ व्या, केविन डी ब्रुएनने ५१ व्या मिनिटाला पेनल्टीवर आणि फिल फोडेनने ९०+२ व्या मिनिटाला गोल केला. आर्सेनलच्या डेव्हिड लुईजला ४९ व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर आर्सेनलला १० खेळाडूंनी खेळावे लागले. दोन्ही संघाचे खेळाडू वर्णभेद विरुद्ध लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरले. सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी गुडघ्यावर बसून वर्णभेदाविरुद्ध निषेध व्यक्त केला. स्टेडियममध्ये चाहत्यांना बंदी होती.

बातम्या आणखी आहेत...