आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय अजिंक्यपद ४० व्या कुमार खो खो स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्र व कोल्हापूरच्या मुले व मुलींनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कोल्हापूरला राष्ट्रीय स्पर्धेत थेट प्रवेश असतो.
येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी सकाळी कोल्हापूरच्या मुलांनी शेवटच्या साखळी सामन्यात मध्यभारतचा ३०-१३ असा १७ गुणांनी पराभव केला. त्यांच्या सुशांत हजारे याने आक्रमणात ९ गडी बाद करताना १.०० व १.४० मिनिटे पळती करीत अष्टपैलू खेळ केला. मुलींच्या गटात त्यांनी राजस्थानवर १०-०७ असा एक डावाने विजय मिळविला. स्वातीने ४.४० व २.१० अशी संरक्षणाची खेळी केली.
गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी मणीपुरला १८-५ एक डाव १३ गुणांनी नमविले. यात सौरभ अहिर (२.४० मिनिटे व २ गुण),धीरज भावे (२.०० मिनिटे व २ गुण) तर किरण वसावे (२.४० नाबाद व ३ गुण) असा अष्टपैलू खेळ केला. मनिपुरकडून ख्रिस्तोफरने १.१० मिनिटे पळती करीत लढत दिली. मुलींनी तेलंगणाचा २३-३ असा एक डाव राखून धुव्वा उडविला. दिपालीने आपल्या धारदार आक्रमणात सहा गडी टिपले. गौरी शिंदे हीने नाबाद तीन तर सरिता दिव्या व जानव्ही पेठे यांनी प्रत्येकी २.३० पळती केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.