आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार खो-खो स्पर्धा:गत चॅम्पियन महाराष्ट्राची विजयी घोडदौड कायम; खो-खो स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची केली नोंद, आसामला हरवले

अजितकुमार संगवे | भुवनेश्वर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र विरुद्ध आसाम या मुले व मुलींच्या सामन्यातील क्षण

गत चॅम्पियन महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आपला दबदबा कायम ठेवताना राष्ट्रीय अजिंक्यपद ४० व्या कुमार खो खो स्पर्धेत गुरुवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. सौरभच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या किशोर संघाने गुरुवारी दुसऱ्या सामन्यात आसामला पराभूत केले.

महाराष्ट्राने बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर आसामचा १५-१० असा एक डाव राखून ५ गुणांनी आसामवर मात केली. सूरज जोहरे व आदित्य कुदळे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद करीत दोघांनी प्रत्येकी दोन मिनिटे पळतीचा खेळ केला. दुसऱ्या डावात किरण वसावे व भगतसिंग वसावे यांनी अनुक्रमे २.०० व २.१० मिनिटे संरक्षण केले. आसामच्या पप्पू गोगाई याने १.३० मिनिटे पळती करीत एकाकी लढत दिली. मात्र, आसामचा बलाढ्य महाराष्ट्रविरुद्ध विजयाचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला.

दिपाली, कौशल्याची अष्टपैलु खेळी; महाराष्ट्र विजयी

युवा कर्णधार गौरी शिंदेच्या कुशल नेतृत्वात महारा‌ष्ट्र संघाने मुलींच्या गटात दुसरा विजय साकारला. महाराष्ट्राने दिपाली राठोड (२.२०मिनिटे व ६ गुण) व कौशल्या पवार (१.२० व १.४० मिनिटे नाबाद आणि ५ गुण) यांच्या अष्टपैलू खेळीतून आसामवर २४-९ असा एक डाव राखून १५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. तत्पूर्वी पहिल्या डावात अश्विनी शिंदे (२.०० मिनिटे), सरिता दिव्या व जानव्ही पेठे (प्रत्येकी २.१० मिनिटे) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली.

सकाळच्या सत्रातील निकाल : मुली : पंजाब वि.वि. छत्तीसगड ९-६, पश्चिम बंगाल वि.वि. मध्य प्रदेश २३-८, मणिपूर वि.वि. आंध्रप्रदेश १२-९, राजस्थान वि.वि. पाँडिचेरी १५-५, केरळ वि.वि. बिहार १६-५, दिल्ली वि.वि. दादर हवेली ३५-०.

मुले : मध्य भारत वि.वि. पंजाब २५-११, केरळ वि.वि. झारखंड १८-१४, ओरिसा वि.वि. बिहार ३८-४, तामिळनाडू वि.वि. पाँडिचेरी ११-५, हरियाणा वि.वि. उत्तराखंड १४-११, आंध्रप्रदेश वि.वि. दादर हवेली १६-६, कर्नाटक वि.वि. मध्य प्रदेश २७-११, दिल्ली वि.वि. हिमाचल प्रदेश १८-७, पश्चिम बंगाल वि.वि. त्रिपुरा २३-४.

बातम्या आणखी आहेत...