आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • National Kho Kho Tournament: Maharashtra Boys And Girls Double Crown; The Title Was Won By An Innings

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा:महाराष्ट्राच्या मुला-मुलींना दुहेरी मुकुट; डावाने बाजी मारत मिळवले विजेतेपद

अजितकुमार संगवे / विजय मांडके | फलटणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या दोन्ही संघाने डावाने विजय मिळविण्याची घोडदौड करीत किशोर-किशोरी गटाच्या ३२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. कर्णधार राज जाधव व धनश्री कंक हे सर्वोत्कृष्ट भरत व इला पुरस्काराचे मानकरी ठरले.

या स्पर्धेत उपांत्य सामन्यापर्यंत डावाने विजय मिळविणाऱ्या कर्नाटकला महाराष्ट्राच्या मुलीकडून ५-९ असा डावाने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम संरक्षण करताना महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीतील संरक्षकांनी भक्कम बाजू सांभाळली. कर्णधार धनश्री कंक २.३० व विद्या तामखडे नाबाद ३.०० मिनिटे पळती केली. पहिल्या डावात महाराष्ट्राचे २ गडी बाद झाले. महाराष्ट्राने आपल्या पहिल्या आक्रमणात ९ गडी टिपले. यात धनश्री, विद्या व प्राजक्ता बनसोडे यांनी प्रत्येकी २ गडी टिपले. दुसऱ्या संरक्षणात धनश्रीने २.५० व विद्याने ३.५० मिनिटे पळती केली. कर्नाटककडून हर्शिता (१.५० मिनिटे व २ गुण) व सुस्मिता (१.३० मिनिटे व १गुण) यांनी अष्टपैलू खेळी करीत लढत दिली मुलांनीही कर्नाटकावर १३-७ असा शानदार विनय मिळविला. महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीतीलच कर्णधार राज जाधव १.४०, आशिष गौतम २.२५, हरद्या वसावे (२.५० मिनिटे) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. आक्रमणात आशिष व हरद्या यांनी प्रत्येकी ३ गडी टिपले. दुसऱ्या संरक्षणात राजने २.३०, जितेंद्र वसावेने २.०० मिनिटे व आशिषने १.३० मिनिटे पळती केली. कर्नाटककडून कुमारने १.१० व २ गुण तर चेतन याने ५० सेकंद पळती करीत २ गुण मिळवले.

बातम्या आणखी आहेत...