आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • National Sports Awards : Virtual Ceremony Celebrated For The First Time, With 60 Out Of 74 Participating In The Online Ceremony; Five Khel Ratnas Got Rs 25 Lakh Each And Arjun Got Rs 15 Lakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान:प्रथमच व्हर्च्युअल सोहळा साजरा, एकूण 74 पैकी 60 जणांचा ऑनलाइन सोहळ्यात सहभाग; पाच खेलरत्नला प्रत्येकी 25 लाख, अर्जुनला मिळाले 15 लाख

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिका पाटकर, नंदन बाळ, मणिका बत्रा, सुयश जाधव, दत्तू भोकनळ, राहुल आवारे
  • सोहळ्यात राणी रामपाल पीपीई किटसह सहभागी

देशातील क्रीडा क्षेत्रातील स्टार खेळाडूंना शनिवारी व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. कोरोनामुळे पहिल्यांदाच पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात न होता व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आला. साईच्या ११ केंद्रांतून ७४ पैकी ६० जणांनी ऑनलाइन सोहळ्यात सहभाग घेतला. खेलरत्नसाठी निवड झालेली राणी रामपाल पीपीई किट घालून साईच्या बंगळुरू केंद्रात पोहोचली होती. मणिका बत्रा व मरियप्पन थंगावेलूनेदेखील सहभाग घेतला. क्रिकेटर रोहित शर्मा व विनेश फोगाट सहभागी झाले नाही. क्रीडामंत्र्यांनी यंदा ५ खेलरत्नसाठी २५-२५ लाख व २७ अर्जुन पुरस्कारार्थींसाठी १५-१५ लाख रुपये मिळाले. “खेळाने केवळ तरुण चारित्र्यवान पिढी तयार होते. नाही युवकांना खेळाशी जाेडणे म्हणजेच राष्ट्रनिर्माण असल्याची भावना राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी सोहळ्या प्रसंगी व्यक्त केली.’

लक्ष्य इन्स्टिट्यूट : १० मित्रांनी गरजू खेळाडूंना दिला मदतीचा हात

शेखर झा| पुण्यातील लक्ष्य इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. १० मित्रांनी मिळून २०१० मध्ये गरजवंत खेळाडूंना मदतीचा हात दिला. आता ही संस्था ९ वेगवेगळ्या खेळांतील ४० खेळाडूंना मदत करत आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक खेळाडूंना सहकार्य केले. संस्थेचे सचिव सुंदर अय्यर म्हणतात, “आमची संस्था कनिष्ठ स्तरावरील खेळाडूंना मदत करते. चांगल्या खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आमची एक समिती काम करते. आम्ही नेमबाजी, तिरंदाजी, कुस्ती, बॉक्सिंग, टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, जलतरणपटूंना मदत करतो.’

आर्मी स्पोर्ट‌्स इन्स्टिट्यूट : शिस्तीमुळे वर्षात १२ खेळाडू ऑलिम्पिकला पात्र

एकनाथ पाठक| पुण्यातील आर्मी स्पोर्ट‌्स इन्स्टिट्यूटलादेखील राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार दिला. शिस्त व ध्येयानुसार एक वर्षात १२ खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. वर्ष २००१ मध्ये इन्स्टिट्यूट सुरू झाली होती. येथे कुस्ती, तलवारबाजी, डायव्हिंग, बॉक्सिंग, तिरंदाजी, अॅथलेटिक्स व वेटलिफ्टिंगची तयारी केली जाते. या संस्थेच्या यशाचा मंत्र स्वत:वरील विश्वास, कठोर मेहनत व स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची इच्छाशक्ती आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये दोन हजार खेळाडूंची निवड केली जाते. यातील उत्कृष्ट ३०० जणांची निवड केली जाते.

प्रतिष्ठित पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली : राहुल आवारे

देशातील मानाचा पुरस्कार मिळाल्याने मला अानंद झाला असून हे यश माझे आई-वडील, प्रशिक्षक स्व.हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार यांच्या प्रयत्नातून मिळाले अाहे. मागील १० ते १२ वर्षांपासून मी खेळात माझे याेगदान देऊन विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत कामगिरी केली त्याचे हे सर्वाेच्च फळ अाहे. अर्जुन पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली असून पुरस्कारामुळे नवीन प्रेरणा घेऊन अाॅलिम्पिक स्पर्धेत यश मिळवण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास कुस्तीपटू राहुल आवारेने पुरस्कार मिळवल्यानंतर व्यक्त केला. तो सध्या नाशिक येथील पाेलिस प्रशिक्षण अकॅडमीत मी पाेलिस उपअधीक्षकाचे प्रशिक्षण घेत आहे.

महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू राहुल आवारे, रोइंगपटू दत्तू भोकनाळ, टेटेपटू मधुरिका पाटकर, खो-खोपटू सारिका काळे, पॅरा-जलतरणपटू सुशय जाधव, घोडस्वारीपटू अजय सावंत यांना अर्जुन पुरस्काराने आणि बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे व तृप्ती मुरगंुडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवले.

मेहनत करा, यश मिळेल

टेबल टेनिस खेळात पहिली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी खेळाडू म्हणून सन्मानित हाेणे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण अाहे. अनेक वर्षांच्या परिश्रमाचे हे फळ आहे. नवाेदित खेळाडूंनी मेहनत, जिद्द, चिकाटी ठेवत सातत्याने प्रयत्न केले तर त्यांना यश मिळू शकेल. - मणिका बत्रा, टेटे (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार)