आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल स्पर्धा आता एकाहून एक रंजक सामन्यांच्या माध्यमातून आपल्या अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करत आहे. काही दिवसांपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन उल हक व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली मैदानातच एकमेकाना भिडले होते. या वादामुळे विराट कोहली व गौतम गंभीर एकमेकांपुढे आले होते. याची माध्यमांत खमंग चर्चा रंगली होती.
या प्रकरणी सामनाधिकाऱ्यांनी गौतम गंभीर व विराट कोहलीवर कठोर भूमिका घेतली. दोघांवरही 100 टक्के सामना शुल्काचा दंड ठोठावला. त्यानंतर आता लखनऊच्या नवीन उल हकने पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधून आगीत तेल ओतण्याचे काम केले.
'जसा आहेस, तसाच रहा... बदलू नको'
नवीन उल हकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात तो गौतम गंभीरसोबत दिसत आहे. त्याच्या खाली त्याने कॅप्शन दिले आहे - लोकांशी तसाच व्यवहार करा, जसे ते आहेत. लोकांसोबत त्यांच्या पात्रतेनुसार वागा. याशिवाय नवीने गौतम गंभीरचा उल्लेख GOAT म्हणूनही केला आहे. त्याच्या या पोस्टवर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर म्हणाला - आहे तसाच रहा... बदलू नकोस.
सोशल मीडियावर व्हायरल झाली पोस्ट
नवीन उल हकने आपल्या पोस्टमध्ये विराट कोहलीचे नाव घेतले नाही. पण त्याचा रोख त्याच्याकडेच होता हे स्पष्ट आहे. सोशल मीडियावरील अनेक यूजर्सनी नवीनच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या पोस्टचे समर्थन केले. तर काहींनी या पोस्टची काहीच गरज नव्हती, असे त्याला सुनावले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सने नवीनसाठी 50 लाख रुपये मोजलेत. या खेळाडूने आपल्या गोलंदाजीमुळे मोठा प्रभाव पाडला आहे.
कोहली-गंभीरच्या वादाशी संबंधित खालील बातम्या वाचा...
वादाचे मैदान:कधीकाळी गौतम गंभीरने कोहलीला दिला होता स्वतःचा 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड; आता का आहे दोघांत 36 चा आकडा?
विराट कोहली व गौतम गंभीर या दोघांनीही टीम इंडियासाठी योगदान दिले आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा गौतम गंभीरने टीम इंडियात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. 2008 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराटला वनडे सेंच्युरीला जवळपास वर्षभराची प्रतिक्षा करावी लागली होती.
डिसेंबर 2009 मध्ये विराटने श्रीलंकेविरोधात शतक ठोकले. या सामन्यात गौतम गंभीरने 150 धावांची खेळी केली होती. त्याची सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅचसाठी निवड करण्यात आली होती. सामना संपल्यानंतर जेव्हा त्याला हा पुरस्कार दिला गेला, तेव्हा त्याने आपला अवॉर्ड विराटला दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी...
क्रिकेटचे किस्से:गौतम गंभीर - विराट कोहलीच्या वादाने क्रिकेटची प्रतिष्ठा पणाला, वाचा क्रिकेटच्या इतिहासातील 5 लज्जास्पद घटना
क्रिकेट अनिश्चिततांनी भरलेला खेळ आहे. कदाचित यामुळेच त्याला जंटलमन गेम म्हटले जाते. पण अनेकदा काही खेळाडू व स्टेडिअममधील प्रेक्षकांमुळे या खेळाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. आयपीएलच्या बंगळुरू - लखनऊतील सोमवारच्या सामन्यात गौतम गंभीर व विराट कोहलीच्या भांडणाने क्रिकेटपुढे पुन्हा एकदा ही स्थिती उद्धवली.
क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आपसांत भिडल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक सामन्यांत खेळाडूंमध्ये तू-तू मै-मै झाले आहे. चला तर मग पाहूया क्रिकेटच्या प्रतिष्ठेला तडा देणाऱ्या 5 लाजिरवाण्या घटना... येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.