आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीवर शास्त्रींची टीका:आगामी काळामध्ये एनसीए खेळाडूंचे घर बनेल : शास्त्री

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवी शास्त्री यांना वाटते की, वरिष्ठ भारतीय गोलंदाजांना वारंवार दुखापत होणे “अवास्तव’, “हास्यास्पद’ आणि “निराशाजनक’ आहे. दीपक चाहरच्या ताज्या दुखापतीवर चर्चा करताना शास्त्री यांनी मत व्यक्त केले. चाहरने मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात डाव्या हाताच्या स्नायूच्या दुखापतीमुळे फक्त एकच षटक टाकले. आता त्याच्या दुखापतीची तपासणी केली जाईल. बाकीच्या आयपीएलमध्ये तो भाग घेणार की नाही, त्यानंतर कळेल. अनेक खेळाडू एनसीएमध्ये कायमचे राहत आहेत. फक्त त्यांना तेथे निवासाची परवानगी मिळेल. भारताचे माजी क्रिकेटपटू शास्त्री यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीवर हा खरपूस समाचार घेतला. वास्तविक दीपक चहरने पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी २०२२ मध्ये बहुतांश काळ एनसीएमध्येच घालवला आणि आता पुन्हा दुखापत झाली. त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप सेन, मोहसीन खान व यश दयाल इत्यादी वेगवान गोलंदाजही दुखापतीमुळे मैदानात आणि मैदानाबाहेर गेले आहेत. शास्त्रींच्या मते या खेळाडूंवर कामाचा फारसा ताण नाही. एनसीएकडून फिटनेस सर्टिफिकेटही मिळाले आहे, तरीही ते सलग ४ पेक्षा जास्त सामने का, खेळू शकत नाही हे कळत नाही. खेळाडूंना सारखी दुखापत हाेते, हे कसले प्रशिक्षण आहे, असे कडक शब्दात ताशेरे ओढले.