आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Neeraj Chhepra Became Champion In Diamond League; Qualify For Next Year's World Championships | Marathi News

साेनेरी यश:नीरज चाेप्रा डायमंड लीगमध्ये ठरला चॅम्पियन; पुढच्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र

लुसाने3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाेकियाे ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चाेप्राने लुसाने येथील डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक साेनेरी यश संपादन केले. त्याने शनिवारी डायमंड लीगमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने ८९.०८ मीटरचा भाला थ्राे करून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय अँथलेटिक ठरला. त्याचे हे या स्पर्धेतील ऐतिहासिक यश ठरले.

या साेनेरी यशाबराेबरच त्याने आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आपला प्रवेशाचा पल्ला गाठला. ही स्पर्धा पुढच्या वर्षी २०२३ मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे हाेणार आहे.आता लुसाने येथील डायमंड लीगमध्ये चेक गणराज्यच्या जॅकब वडलेज्चाेला राैप्यपदकाची कमाई करता आली. भारताच्या २४ वर्षीय नीरजने आपल्या करिअरमध्ये तिसऱ्यांदा ८९ पेक्षा अधिक मीटरपर्यंत भालाफेक करण्याची कामगिरी केली आहे. त्याने पावाे नुरमी गेम्समध्ये त्याने ८९.३० मीटरचा थ्राे केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...