आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Neeraj Chopra Interview; Tokyo Olympics Men's Javelin Throw Final Gold Medalist Neeraj Chopra | Neeraj Chopra Milkha Singh Tokyo Olympics; News And Live Updates

'गोल्डन बॉय'ची मुलाखत:नीरज चोप्रा म्हणाला - खेळ आणि देशासाठी पदके जिंकणे हा योजनेचा भाग नव्हता, पण योगायोगाने केली भाला फेकण्यास सुरुवात

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोडियमवर उभे राहण्याची भावना वेगळीच

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी नीरज चोप्राने देशाची मान उंचावली. ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून त्याने देशासाठी सुवर्णपदक पटकावले. यामुळे त्याचा सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे. विशेष म्हणजे नीरजने सुवर्णपदक जिंकताच काही तासाच्या आत कोट्यवधींचे बक्षीस जाहीर झाली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नीरज चोप्रा म्हणतो की, खेळ माझ्या कधीच नियोजनाचा भाग नव्हता.

आपण खेळातून देशासाठी पदक जिंकू याचा विचारदेखील मी कधीही केला नव्हता. माझ्या कुटुंबात किंवा माझ्या गावात कोणीही खेळात नसल्याचे नीरजने म्हटले आहे. नीरज पुढे म्हणाला की, खेळांमध्ये येणे हा माझा योगायोग आहे. मी स्टेडियममध्ये गेलो आणि भालाफेक करायला सुरुवात केली. त्यानंतर कठीण परिश्रम घेत मी हे शिखर गाठले आहे. यावेळी मला अनेक लोकांनी पाठींबा देत मदत केली.

सुवर्ण मिळेपर्यंत आराम करु शकलो नाही
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाले की, 'मला ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची होती. सुवर्णपदकाची पुष्टी होईपर्यंत मी आराम करू शकलो नाही. कारण इतर खेळाडू माझ्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करू शकले असते. दरम्यान, स्पर्धेसाठी मानसिक तयारी करणे आवश्यक असल्याचे चोप्राने सांगितले.

पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत भाला फेकल्यानंतरच नीरजला खात्री होती की त्याने पदक जिंकले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत भाला फेकल्यानंतरच नीरजला खात्री होती की त्याने पदक जिंकले आहे.

पोडियमवर उभे राहण्याची भावना वेगळीच
'पदक जिंकल्यानंतर पोडियमवर उभे राहण्याची भावना वेगळी होती. याचे वर्णन मला शब्दात करता येणार नसल्याचे नीरजने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. तो पुढे म्हणाला की, टोकियो ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम केले होते, अडचणीही आल्या. परंतु, जेंव्हा यश मिळाले, तेंव्हा थोडा भावनिक झालो. ऑलिम्पिक दरम्यान नीट झोप लागली नाही. पहिले दोन-तीन दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. काल पदक जिंकल्यामुळे चांगली झोप लागली. यावेळी थकवा आणि आनंद दोन्ही होते. मी अशावेळी पदक उशीखाली घेऊन झोपलो. मला खूप गाढ झोप लागली होती.

मिल्खा सिंग यांना अपर्ण केले सुवर्ण
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरजने ते पदक मिल्खा सिंग यांना समर्पित केले. तो पुढे म्हणाला की, ते मला स्वर्गातून बघत असतील. मला पदकासह मिल्खा सिंग यांना भेटायचे होते. मला माहित होते की, आज मी काहीतरी सर्वोत्तम करणार आहे. मला ऑलिम्पिकचा विक्रम मोडायचा असल्याने मी ही कामगिरी करु शकलो असे तो म्हणाला.

माझे स्वप्न पूर्ण केले - पीटी उषा
नीरजच्या यशाबद्दल फ्लाइंग एंजेल पीटी उषा म्हणाली की, नीरजच्या या यशाने आज माझे 37 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जे स्वप्न अपूर्ण राहिले होते. धन्यवाद माझ्या मुला.

नीरज चोप्रावर बक्षीसांचा वर्षाव
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. विजयाच्या 3 तासांच्या आत, नीरजला 13.75 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. यामध्ये राज्य सरकारांपासून ते रेल्वे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना, याच्या वतीने नीरजला रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...