आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑलिम्पिक गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि डायमंड लीग यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने आणखी एक यश प्राप्त केले आहे. डायमंड लीगमध्ये सलग दुसरे सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
25 वर्षीय नीरजने दोहा येथे झालेल्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भाला फेकला होता. ही नीरजची सुवर्ण पदक जिंकणारी कामगिरी ठरली. नीरजने 2023 सालचे पहिले पदक जिंकले आहे.
गेल्या वर्षी नीरजने झुरिच येथे डायमंड लीगमध्ये पहिले सुवर्ण जिंकले होते. 2022 मध्ये नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी रौप्य पदकही जिंकले होते.
आता वाचा अंतिम सामन्याचा थरार...
वाडलेच-चोप्रा यांच्यात निकराची लढत
भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि चेक प्रजासत्ताकचा रौप्यपदक विजेता जेकब वाडलेच यांच्यात स्पर्धा झाली. दोघांच्या विजय-पराजयामधील फरक केवळ 0.04 मीटर होता यावरूनच या सामन्यातील रंजकता लक्षात येते.
भालाफेक अंतिम फेरीत, प्रत्येक खेळाडूला 6 थ्रो म्हणजेच 6 प्रयत्न दिले जातात. यापैकी सर्वोत्तम थ्रो गणला जातो.
90 चा आकडा पार करता आला नाही, तरी सुवर्ण
या चॅम्पियनशिपपूर्वी नीरज दोहामध्ये 90 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करण्याचा विक्रम करेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. दोह्यातील वाऱ्याने त्याला तसे करण्यापासून रोखले. नीरजने 90+ मीटरचा टप्पा गाठला नसला तरी त्याने देशाला सुवर्णपदक नक्कीच मिळवून दिले.
2022 मध्ये 88.44 मीटर फेक
चोप्राने 2022 च्या डायमंड लीगमध्येही सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर चोप्राने 88.44 मीटरची थ्रो केली. याआधी नीरजने 2017 आणि 2018 मध्येही फायनलसाठी पात्रता मिळवली होती. 2017 मध्ये तो सातव्या आणि 2018 मध्ये चौथा होता.
चोप्राचे 7 वे आंतरराष्ट्रीय सुवर्ण
नीरज चोप्राने आपल्या वरिष्ठ कारकिर्दीतील सातवे आंतरराष्ट्रीय सुवर्ण जिंकले आहे. याआधी चोप्राने आशियाई खेळ, दक्षिण आशियाई खेळ, ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.