आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेळ संध्याकाळी 5 ची.... हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गाव, जिथे सातासमुद्रापार इतिहास रचणारा खेळाडू नीरज चोप्रा याचे बालपण गेले. गावात प्रवेश केल्यावर, चौकामधल्या पारावर लोकांची गर्दी दिसली, ज्यावर वडिलधाऱ्यांच्या लोकांचा समूह हुक्का घेत बसले होते. त्यात ते सर्वजण नीरज चोप्राच्या यशाबद्दल जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या निरजचे,आनंदाने कौतुक करताना, गप्पा मारताना दिसले. मुलाच्या कर्तृत्वाने कुटुंबसुद्धा आनंदाने या वर्षावात अभिमानाने न्हाऊन निघत होते.
दिव्य मराठीची महिला प्रतिनिधी दीप्ती मिश्रा या ज्यावेळी खांद्रा या गावात पोहोचली तेव्हा चौकात समुहामध्ये बसलेले नीरज चोप्राचे आजोबा धर्मेंद्र सिंह आणि वडील सतीश सिंह यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. तिथे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
काका भीम सिंह आपल्या लाडक्या मुलाच्या कथा तिथे बसलेल्या सर्व लोकांना सांगत होते. गावातील आणि घरातील काही मुलं पाहुण्यांच्या स्वागतामध्ये तोंड गोड करण्यात मग्न होती. मीही काही वेळ चौकात पारावर बसून तिथेच नीरजच्या बालपणाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली.
वयाच्या 13 व्या वर्षी नीरजचे वजन 80 किलोपेक्षा जास्त होते
जवळच पगडी घालून बसलेले आजोबा धर्मेंद्र सिंह हरियाणवी स्वरात सांगू लागले - 'नीरज घरातील सर्वात मोठा मुलगा आहे. प्रत्येकजण त्याला खूप लाड करतात. विशेषतः त्याचे आजी आजोबा. आजी त्याला आपल्या मांडीवर बसवून दुधाने भरलेली वाटी, चुरमा, मिठाई देऊन खूप खाऊपिऊ घालायची. यामुळे वयाच्या 13 व्या वर्षी नीरजचे वजन 80 किलोपेक्षा जास्त झाले होते. त्याचा लठ्ठपणा पाहून घरच्यांना काळजी वाटू लागली. त्याचे वजन कमी करण्यासाठी म्हणून त्याला पानिपतमधील जिममध्ये पाठवण्यात आले, जिथे तो वजन कमी करण्यासाठी भरपूर घाम गाळायचा.
नीरजचा पहिलाच प्रयत्न पाहून प्रशिक्षक सर झाले आश्चर्यचकित
धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, ही त्या दिवसांची गोष्ट आहे - एके दिवशी नीरज जिम सोडून जवळच्या स्टेडियममध्ये पोहोचला. तिथे काही मुले भालाफेकचा सराव करत होती. नीरजने त्या मुलांशी बोलून एकदा भाला फेकायची इच्छा व्यक्त केली, मग त्याने पहिल्यांदा भाला पकडला. पहिल्याच वेळी नीरजचा भाला इतका दूर पडला, जिथे अनेक महिने सराव करणाऱ्या मुलांनाही ते पोहोचता आले नाही.
प्रशिक्षकाने विचारले - तू कोण आहेस? कुठे सराव करत आहात? नीरजने उत्तर दिले- मी नीरज चोप्रा आहे. वजन कमी करण्यासाठी मी खांद्रा गावातून जवळच्या जिममध्ये येतो, यावर प्रशिक्षक म्हणाले – जिम सोड आणि उद्यापासून स्टेडियममध्ये ये. इथे तूझे वजनही कमी होईल आणि नीरजने त्याच दिवसापासून जिम सोडली आणि स्टेडियममध्ये जाऊन सरावाला सुरुवात केली.
मी त्यांना घर बघायचे आणि घरातील महिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नीरजचे वडील, सतीश सिंह, पांढरा कुर्ता-पायजामा घातलेले, मला मीटिंगपासून जवळच 400 मीटर दूर असलेल्या त्यांच्या घरी घेऊन गेले. घरी जाताना मी विचारले- नीरज कधीपासून गावी आला नाही? यावर उत्तर देताना वडील म्हणतात- साधारण आता 7 महिने होणार आहेत.
ऑलिम्पिक पदक जिंकून झाल्यावर केवळ दोन दिवसांसाठी तो येथे आला होता. सध्या त्याच्याकडे आणखी काही स्पर्धा आहेत, ज्या सप्टेंबरपर्यंत चालतील. त्यानंतर वेळ मिळाल्यास तो घरी येऊ शकतो. थोडावेळ थांबल्यावर ते पुन्हा म्हणाले - गेल्या दहा-बारा वर्षात तो जवळपास महिनाभरच आमच्यासोबत तो असेल. आता त्याला होळी-दिवाळी, रक्षाबंधन, वाढदिवस सर्व सण बाहेर साजरे करावे लागतात.
आलिशान इमारत, ज्याच्या बाहेर आलिशान कार पार्क केली होती. घराबाहेर बांधकाम सुरू होते. घरात प्रवेश करताच नीरज चोप्राची बहीण गीता आणि चुलत बहीण संगीता भेटल्या. मी काही पावले पुढे गेल्यावर तिथेच काळ्या रंगाचा सूट घातलेली निरजची आई सरोज उभ्या होत्या.
पुढे आम्ही गेस्ट रूमच्या दिशेने निघालो, जिथे आमचे संभाषण सुरू झाले. आमच्या संवादादरम्यान, सतीश सिंह यांच्या फोनवर सतत नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींचे अभिनंदन करण्यासाठी कॉल येत होते.
प्रश्न: तुमच्या मुलाच्या यशाबद्दल तुम्ही किती आनंदी आहात?
आई : शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका आनंद झाला आहे. त्याने स्पर्धा जिंकताच मी खूप खूप आनंद झाला. तो माझ्याजवळ असता तर मी माझ्या मुलाच्या कपाळाचा मुका घेतला असता. त्याला मिठी मारली असती. 7 महिने झालेत त्याला समोरासमोर पाहिले नाही. त्याची खूप आठवण येते, पण आम्ही त्याला स्वतःहून कधीच कॉल करत नाही. कारण सरावासाठी तो नेहमी इतर देशांमध्ये राहतो. तिथली वेळ आणि इथली वेळ वेगवेगळी आहे, त्यामुळे त्याला वेळ मिळाला की तो स्वतःच कॉल आणि व्हिडिओ कॉल करतो.
प्रश्न: नीरजने तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी कधी तुम्हाला स्वयंपाकघरात मदत केली आहे का, की तो फक्त वडिलांना शेताच्या कामात मदत करतो?
आई : तो इथे राहत असताना इतर मुलांप्रमाणे शेतात काम करत असतो. तसेच घरातील सामान आणणे अशा सर्व कामात तो मदत करत असतो. आता इथे आल्यावर त्याच्याकडे काम करायला पुरेसा वेळ नाही. घरात अनेक लोक आता काम करत असतात. मी जेवण बनवते, घरातले सगळेजण एकत्रितच जेवतो.
रात्री उशिरापर्यंत सर्वजण एकत्र बसून गप्पा मारतो. हंसी-मजाक सगळे करत असतो, वडील सतीश आईच्या मुद्द्याशी सहमत दर्शवत म्हणाले -तो बाकीच्या इतर मुलांसारखा सामान्य आहे. त्याला सगळ्यांना भेटणं, बोलणं, शेजारची काळजी घेणं आणि घरातल्या सगळ्यांसोबत खाणं-बोलणं आवडतं.
प्रश्न : आईला आपल्या मुलाने सैनिक होणे ही मोठी गोष्ट वाटते की देशासाठी पदक जिंकण्यापेक्षा कोणाला जास्त आनंद मिळतो?
आई : मुलगा सैन्यात सुभेदार आहे. तो लष्करात देशाचे रक्षण करत आहे. सध्या तो खेळात मेहनत घेतो, तिथेही तो देशासाठी पदके जिंकत आहे. देशाला अभिमान वाटावा अशा दोन्ही ठिकाणी देशसेवेचे तो काम करत आहे, त्यामुळे त्यांच्या दोन्ही कामांवर मी खूपआनंदी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.
प्रश्न: नीरजची अशी कोणतीही सवय जी तुम्हाला आवडत नाही - जसे उशीरा झोपणे, जेवण नीट न करणे किंवा शाळेतून तक्रार येणे?
आई : नाही. सगळी मुलं खोडकर असतात, नीरजही लहानपणी खोडकर होता, पण त्याची कधी घरी तक्रार आली नाही. तो अभ्यास करायचा, मग त्याला उठावं लागायचं, पण खेळाचा सराव सुरू झाल्यापासून त्याला कधीच उठायची गरज भासली नाही. तो स्वतःच उठतो. सरावासाठी तो स्टेडियममध्ये जातो आणि नंतर वेळेवर शाळेत पोहोचायचा.
तसेही तो केवळ माझाच मुलगा नाही, त्याच्या घरात इतरही माता आहेत, संपूर्ण कुटुंबाचा तो लाडका मुलगा आहे, त्यामुळे त्याची कोणतीही सवय सुधारण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.
प्रश्न: नीरजला काय खायला आवडते? तुमचा मुलगा घरी परतल्यावर तुम्ही काय कराल?
आई : त्याला खीर, हलवा आणि चुरमा आवडतो. तो घरी आल्यावर मी त्याच्यासाठी चुरमा बनवीन. त्याला चुरमा इतका आवडतो की तो आला तरी चुरमा खातो आणि जातो, तसे, तो सर्व काही खातो, तो खाण्यासाठी अजिबात त्रास देत नाही. फक्त तळलेले पदार्थ थोडे कमी आवडते.
प्रश्न : तुम्हाला कसली सून हवी आहे?
आई: आधी ती थोडं हसते, मग हरयाणवीत भाषेमध्ये म्हणते- बघा जी, देव त्यांच्यासाठी कसली जोडी बनवतो, यात आता वेळ आहे. मुलाला हवाी - त्याच्यासारखी खेळाडू. तर बाकीच्यांना सुन सुशिक्षित पाहिजे आता बघा ती शिकलेली असो की खेळाडू. आपण जो विचार करतो तशी थोडीच मला लगेच मिळणार आहे.
मुलाला परदेशी मुलगी आवडली तर? प्रत्युत्तरात आई सरोज म्हणते - हे बघ मला सून कोणीही मिळो माझा मुलगा हा सुखी राहावा एवढीच आमची इच्छा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.