आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Neeraj Chopra Won Hearts Of Pakistani Sports Lovers Did Defend Pakistani Athlete Arshad Nadeem In Javelin Controversy; News And Live Updates

नीरज चोप्राने जिंकली पाकिस्तानींची मने:टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाला घेतल्यानंतर अर्शद नदीमचा केला होता बचाव; पाकिस्तानी म्हणाले - तुम्ही खरे चॅम्पियन

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ शेअर करत अर्शदचा केला बचाव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकणारे भारतीय खेळाडू नीरज चोप्राने पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. भारताने अनेक वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे नीरज चोप्राचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला अंतिम फेरीपूर्वी आपला भाला मिळत नव्हता. परंतु, नंतर तो भाला पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमच्या हातात दिसला. यानंतर अर्शद नदीमवर अनेक आरोप करण्यात आले.

अर्शदने नीरजच्या भालासोबत छेडछाड केली असल्याचा आरोप नीरजच्या समर्थकांनी केला. परंतु, नीरजने हे सर्व आरोप फेटाळत पाकिस्तानी क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. नीरजने आपल्या सोशल मीडियावर हँडलवरुन लोकांनी नियम जाणून घेतल्याशिवाय कोणालाही टार्गेट करू नये असे आवाहन केले. ऑलिम्पिकदरम्यान, अर्शदने चुकीचे असे काहीही केले नाही असे नीरज सांगितले. यामुळे नीरज चोप्रा यांनी सुवर्णपदकानंतर पाकिस्तानी खेळाडूंची मने जिंकली आहेत.

नीरजने काय म्हटले होते?
मुलाखतीदरम्यान नीरजने म्हटले की, 'मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. पण नंतर मी पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला माझ्या भाल्यासह चालताना पाहिले. मी अर्शदला सांगितले की, भाऊ हा माझा भाला आहे. ते मला द्या म्हणजे मी फेकू शकेन.'

व्हिडिओ शेअर करत अर्शदचा केला बचाव
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने वादानंतर एक व्हिडिओ शेअर करत अर्शदचा बचाव केला. लोकांनी कोणत्याही कारणाशिवाय प्रकरण वाढवू नये असे आवाहन नीरज लोकांने केले. इव्हेंटमध्ये भाला जमा केल्यानंतर ते इव्हेंटची मालमत्ता होते. त्यामुळे त्याला कोणी वापरू शकतो. अशावेळी अर्शदने काहीही चुकीचे केले नाही असे म्हणत अर्शदचा बचाव केला.

बातम्या आणखी आहेत...