आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Neeraj Chopra Becomes World's Number One Javelin Thrower; The First Athlete In The Country, Was Ranked Second For 8 Months

कामगिरी:नीरज चोप्रा बनला जगातील नंबर वन भालाफेकपटू; देशाचा पहिला अ‍ॅथलीट, 8 महिन्यापासून होता 2 नंबरवर

दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा जगातील नंबर वन भालाफेकपटू ठरला आहे. ही कामगिरी करणारा तो देशातील पहिला खेळाडू आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाने सोमवारी ही क्रमवारी जाहीर केली. नीरज 1455 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ग्रेनेडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सला 22 गुणांनी पिछाडीवर टाकले.

शेजारी देश पाकिस्तानचा थ्रोअर अर्शद नदीम क्रमवारीत पाचव्या स्थानावर राहिला. नदीमने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नीरज चोप्रा दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. दुसरीकडे, भारताचा रोहित यादव 15व्या आणि डीपी मनू 17व्या स्थानावर असून टॉप-20 मध्ये आहे.

या महिन्यात 5 मे रोजी नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. हा फोटो त्यावेळचा आहे.
या महिन्यात 5 मे रोजी नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. हा फोटो त्यावेळचा आहे.

8 महिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर
30 ऑगस्ट 2022 पासून नीरज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. अँडरसन पीटर्सला प्रथम क्रमांकाचा भालाफेक खेळाडू होता. दरम्यान नीरजने या महिन्यात 5 मे रोजी दोहा येथे झालेल्या दिमांग लीगमध्ये 88.67 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, जगातील नंबर वन अँडरसन पीटर्सने 85.88 मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावले. टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता जाकुब बडलेच दुसऱ्या स्थानावर होता.

फ्रान्समध्ये कामगिरी कायम राखण्याची इच्छा

भारतीय भालाफेकपटू निरज आशियाई क्रीडा स्पर्धेचा गतविजेता आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. यावर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला आपले विजेतेपद राखायचे आहे. नीरजने गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या युजीन वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते.