आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषक:न्यूझीलंड तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत; आयर्लंड संघाचा पराभव

अॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर कर्णधार विलियम्सनने (६१) आपल्या झंझावाती खेळीतून न्यूझीलंड संघाला यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलचे तिकीट मिळवून दिले. न्यूझीलंड संघाने शुक्रवारी सामन्यात आयर्लंडला धूळ चारली. न्यूझीलंड संघाने ३५ धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ६ गडी गमावत आयर्लंड टीमसमाेर विजयासाठी १८६ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात आयर्लंड संघाला ९ गड्यांच्या माेबदल्यात १५० धावांपर्यंत मजल मारता आली. संघाच्या विजयामध्ये विलियम्सनपाठाेपाठ गाेलंदाज लुकी फर्ग्युसन (३/२२), टीम साउथी (२/२९), सँटनर २/२६) आणि ईश साेढीने (२/३१) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे न्यूझीलंड संघाला तिसरा विजय साजरा करताना अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करता आला. यासह न्यूझीलंड यंदा वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठणारा पहिलाच संघ ठरला. तसेच न्यूझीलंडने करिअरमध्ये तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. विलियम्सनची झंझावाती खेळी लक्षवेधी ठरली. त्याने ३५ चेंडूंत ६१ धावा काढल्या. यासह त्याने करिअरमध्ये १६ वे टी-२० अर्धशतक साजरे केले.

बातम्या आणखी आहेत...