आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी- 20:न्यूझीलंडची मालिकेत बराेबरी; श्रीलंका संघावर 9 गड्यांनी विजय

डुनेडिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर अॅडम मिल्ने (५/२६) आणि टीम सिफर्टने (७९) नाबाद अर्धशतकी खेळीतून न्यूझीलंड टीमला बुधवारी श्रीलंकेविरुद्ध मालिकेत बराेबरी साधून दिली. यजमान न्यूझीलंड संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. न्यूझीलंड संघाने ९ गड्यांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाला १४१ धावांवर आपला डाव गुंडाळावा लागला. प्रत्युत्तरात सलामीच्या पराभवातून सावरलेल्या न्यूझीलंड टीमला तीन टी-२०सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधता आली. आता मालिकेतील तिसरा निर्णायक सामना शनिवारी रंगणार आहे. श्रीलंका संघाने विजयी सलामी देत मालिकेत आघाडी घेतली हाेती. आता श्रीलंका संघाला दाैऱ्यावरील आपला सलग दुसरा मालिका पराभव टाळण्यासाठी माेठी कसरत करावी लागणार आहे. न्यूझीलंड संघाने आता दमदार कमबॅक केले.