आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • New Zealand Vs Africa Cricket Match | Marathi News | Henry Africa Vs New Zeakand | Henry's Seven Victims; Africa's 95 run Knock; New Zealand Lead

न्यूझीलंडविरुद्ध आफ्रिकेची नीचांकी धावसंख्या:हेन्रीचे सात बळी; आफ्रिक्रेचा 95 धावांत खुर्दा; न्यूझीलंडची आघाडी

ख्राइस्टचर्च6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 वेळा दक्षिण आफ्रिका संघाने कसाेटीचा पहिला डाव अवघ्या १०० धावांत गुंडाळला.
  • यजमान न्यूझीलंड संघाच्या पहिल्या डावात दिवसअखेर ३ बाद ११६ धावा

यजमान न्यूझीलंड संघाच्या मॅट हेन्रीच्या (७/२३) सर्वाेत्तम गाेलंदाजीसमाेर पाहुण्या दक्षिण आफ्रिका टीमचा सलामी कसाेटीच्या पहिल्याच दिवशी पहिल्या डावात ९५ धावांत खुर्दा उडाला. यामुळे यजमान न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या कसाेटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला आपला पहिला डाव ४९.२ षटकांत झटपट गुंडाळावा लागला. प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंड संघाने दिवसअखेर २१ धावांची आघाडी घेतली. संघाने ३ बाद ११६ धावा काढल्या. संघाचा हेन्री निकाेल्स (३७) अाणि नील वँगनर (२) मैदानावर कायम आहेत. संघाचा कर्णधार लाॅथम (१५), यंग वील (८) आणि काॅन्वे (३६) बाद झाले आहेत.

आफ्रिका संघाला ९० वर्षांनंतर कसाेटीत आपला पहिला डाव १०० धावांच्या आत गुंडाळावा लागला. यापूर्वी १९३२ मध्ये ऑट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसाेटीत आफ्रिकेने अवघ्या ३२ धावांत आपला गाशा गुंडाळला हाेता. तसेच १९५३ नंतर पहिल्यांदा आफ्रिका संघाने कसाेटीच्या फाॅरमॅटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध नीचांकी धावसंख्या नाेंदवली. ६९ वर्षांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध जाेहान्सबर्ग कसाेटीत यजमान आफ्रिकेने आपला पहिला डाव १४८ धावांत गुंडाळला हाेता.

आता प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजांचा मैदानावर फार काळ निभाव लागला नाही. यातून सात फलंदाज हे एकेरी धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतले. 4 वेळा न्यूझीलंड टीमने कसाेटीत प्रतिस्पर्धी संघाला पहिल्या डावात १०० धावांच्या आत रोखले.

बातम्या आणखी आहेत...