आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका संघाविरुद्ध दुसरी कसाेटी:न्यूझीलंड संघाची पहिल्यांदा डावामध्ये डबल द्विशतके ; श्रीलंकेच्या 2 बाद 26 धावा

वेलिंग्टन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने आत्मविश्वास दुणावलेला यजमान न्यूझीलंड संघ आता घरच्या मैदानावरील कसाेटी मालिका आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठीच संघाने आपल्या २५०० व्या कसाेटी सामन्याच्या पहिल्याच डावात विक्रमाला गवसणी घातली. न्यूझीलंड संघाने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात डबल द्विशतके साजरी केली. संघाला पहिल्यांदाच डावामध्ये दाेन द्विशतके साजरी करता आली. केन विल्यम्सन (२१५) आणि हेन्री निकाेलसने (नाबाद २००) यजमान संघाला हा बहुमान मिळवून दिला. याच माेठ्या खेळीच्या बळावर न्यूझीलंड संघाने ४ बाद ५८० धावांवर आपला पहिला डाव घाेषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. संघाने दिवसअखेर २ बाद २६ धावा काढल्या. अद्याप ५५४ धावांनी पिछाडीवर असलेल्या श्रीलंका संघाचा करुणारत्ने (१६) आणि प्रबाथ जयसूर्या (४) मैदानावर कायम आहे.

विल्यम्सनच्या ८ हजार कसाेटी धावा पूर्ण माजी कर्णधार विल्यम्सनने द्विशतक साजरे केले. यासह त्याने कसाेटी करिअरमध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठला. आता त्याच्या नावे ८१२४ धावांची नाेंद झाली आहे. ताे ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ४१ कसाेटी सामन्यामधून हे यश संपादन केले. यातून त्याने राॅस टेलरला (४० कसाेटी) मागे टाकले.

बातम्या आणखी आहेत...