आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडिया vs इंग्लंड दुसरी कसोटी:इंग्लिश टीम पहिल्या इनिंगमध्ये 134 धावांव ऑलआउट, भारताकडे 195 धावांची आघाडी

चेन्नई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोहित-रहाणेची 162 धावांची भागीदारी

भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 कसोटी सीरिजचा दुसरा सामना चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर होत आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 329 धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या इनिंगमध्ये 134 धावांवर ऑलआउट झाला. भारताला दुसऱ्या इनिंगमध्ये 195 धावांची आघाडी मिळाली आहे. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

इंग्लंडसाठी बेन फोक्सने सर्वाधिक 42 आणि ओली पोपने 22 धावा केल्या. तर, रविचंद्रन अश्विनने 5 आणि अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या. इशांत शर्माला 2 आणि मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली.

अक्षरने कसोटी पदापर्णात रुटला बाद केले

इंग्लंडची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली. इंशात शर्माने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. इंशातने सलामीवीर रोरी बर्न्सला शून्यावर एलबीडब्ल्यू केले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या अक्षरने जो रूटला बाद केले. मागील कसोटीत द्विशतक करणारा जो रूट यावेळी केवळ 6 धावा करू शकला.

अश्विनने 5 बळी घेतले

रविचंद्रन अश्विनने ओपनर डॉम सिबली (16), डॅन लॉरेंस (9), बेन स्टोक्स (18), ओली स्टोन (1) आणि स्टुअर्ट ब्रॉड (0)ला आउठ केले.

भारताच्या दुसऱ्या दिवशी केवळ 29 धावा

दुसऱ्या दिवशी भारताने 6 गडी बाद 300 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र केवळ 29 धावाच करू शकले. दिवसाच्या दुसऱ्या षटकात टीमने 2 गडी गमावले. मोइन अलीने अक्षर पटेल आणि इंशात शर्माला पव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर 96 व्या षटकात ओली स्टोनने कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजला बाद करून भारतीय संघाला रोखले.

मोइन अलीच्या 4 विकेट

भारतीय संघासाठी रोहित शर्माने सर्वाधिक 161 आणि अजिंक्य रहाणेने 67 रन केल्या आहेत. तर, कर्णधार विराट कोहली आणि शुभमन गिल शून्य धावांवर आउट झाले. इंग्लंडच्या मोइन अलीने 4 आणि जॅक लीचने 2 विकेट घेतल्या. तर, ओली स्टोन आणि जो रूटला 1-1 विकेट मिळाल्या.

रहाणेने कसोटी कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक केले. तर रोहित शर्मा 161 धावांवर बाद झाला. रोहितला जॅक लीचने मोईन अलीच्या हाती झेलबाद केले. रोहित आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली. इंग्लडसाठी लीच आणि मोइन अलीने 2-2 गडी बाद केले. तर ऑली स्टोन आणि रूटला 1-1 विकट मिळाली.

रोहितने कसोटी कारकिर्दीतीले 7 वे शतक केले. त्याने 130 चेंडून शतक पूर्ण केले. रोहितने 15 महिन्यानंतर कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने मागील शतक ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. रोहितने सातही शतकं भारतात केली आहेत. चेन्नईत हे त्याचे पहिले शतक आहे.

रोहित-रहाणेची 162 धावांची भागीदारी

तीन गडी गमावल्यानंतर रोहित आणि रहाणे भारताचा डाव सांभाळला. यादरम्यान रोहितने कसोटी कारकिर्दीतील 7 वे शतक ठोकले. त्याने 130 चेंडूत हे शतक पूर्ण केले. त्याने मागील शतक ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. रोहितने सातही शतकं भारतात केली आहेत. चेन्नईत हे त्याचे पहिले शतक आहे.

रोहितने चौथ्यांदा कसोटीत 150+ धावा केल्या. याआधी त्याने वेस्टइंडीज विरुद्ध 2013 मध्ये एकदा (177 धावा) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2019 मध्ये दोनदा (176 आणि 212 धावा) ही कामगिरी केली होती. तर रहाणेनेदेखील कसोटीतील 23 वे अर्धशतक केले. अजिंक्य आणि रोहित दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली.

रोहित आणि पुजाराची 85 धावांची भागीदारी

भारताची सुरुवात खराब राहिली. भारताने दुसऱ्याच षटकात शून्यावर पहिला गडी गमावला. सलामीवीर शुभमन गिल भोपळा न फोडतात तंबूत परतला. वेगवाग गोलंदाज ऑली स्टोनने त्याला पायचीत केले. यानंतर पुजारा 21 धावा काढून बाद झाला. जॅक लीचने त्याला बेन स्टोक्सच्या हाती झेलबाद केले. रोहित आणि पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे अर्धशतक पूर्ण केले. भारताने सलग दोन षटकांत 2 गडी गमावले. 21 व्या षटकात पुजारा आणि 22 व्या षटकात कोहली बाद झाला.

कोहली 11 व्यांदा शून्यावर बाद झाला

कर्णधार विराट कोहलीला पहिल्यांदाच फिरकीपटूने शून्यावर बाद केले. मोइन अलीने त्याला त्रिफळाचीत केले. आतापर्यंत कोहली एकूण 11 वेळा शून्यावर बाद झाला. तो भारतात सलग दोन डावांत त्रिफळाचीत झाला आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात स्टोक्सने कोहलीला 72 धावांवर त्रिफळाचीत केले होते. कोहलीने भारतात 63 डाव खेळले. यामध्ये तो 4 वेळा बोल्ड झाला आहे.

दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

इंग्लंड: डॉम सिबली, रोरी बर्न्स, डैन लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, मोइन अली, जैक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिस वोक्स.

बातम्या आणखी आहेत...