आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team India's Next Captain's IPL Test: Pant And Iyer Back In The Tournament, KL Rahul's Strong Claim

टीम इंडियाच्या पुढील कर्णधाराची IPL कसोटी:पंत आणि अय्यर कर्णधाराच्या स्पर्धेत मागे, केएल राहुलचा मजबूत दावा

लेखक : कुमार ऋत्विज13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहित शर्माने नुकतेच टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. पण वयाचा आणि फॉर्मचा विचार करता रोहित हा भारतीय क्रिकेट संघाचा दीर्घकाळ कर्णधारपद भूषवू शकणार नाही. अशा परिस्थितीत रोहितचा उत्तराधिकारी म्हणून निवडकर्त्यांना कोणत्या खेळाडूसोबत जायचे आहे हे जाणून घेणे हे कुतुहलाचे ठरेल? महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीचे नाव अग्रक्रमाने पुढे येत होते. मात्र आताचा त्याचा फॉर्म पाहाता ते तितकेसे सोपे नक्कीच नाही.

दरम्यान, IPL 15 आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या हंगामाने अनेक दिग्गज कर्णधारांना मैदानात आणले, तर कर्णधारपदाच्या शर्यतीत अचानक काही अनामिक नावेही पुढे आली. प्रत्येक कर्णधाराचे प्लस आणि मायनस गुण असतात. पण कर्णधार असतानाही खेळाडू आपल्या कामगिरीने संघाला विजय मिळवून देऊ शकतो का, हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. टीम इंडिया अशा एका कर्णधाराच्या शोधात आहे, जो समोरुन फक्त बोलत नाही तर प्रत्यक्ष कृती करताना ही दिसतो.

पंतची कर्णधारपदाची कारकीर्द सुरु होण्यापूर्वीच संपली

विराट कोहलीनंतर ऋषभ पंत हा टीम इंडियाचा पुढचा कर्णधार मानला जात होता. अनेक तज्ञांच्या मते या युवा खेळाडूंमध्ये उत्साह भरलेला असून येत्या 10 वर्षात देशाला त्याच्यासारखा आश्वासक कर्णधार मिळणार नाही. षटकारकिंग युवराज सिंग सुद्धा पंतला कर्णधार बनवण्याची मागणी सातत्याने करत होता. पण या आयपीएलने सगळंच चित्र बदलून टाकलं. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या 20 व्या षटकात पंचांनी नो-बॉल न दिल्याने ऋषभ पंत हा अपरिपक्व अशा रस्त्यावरील क्रिकेटपटूप्रमाणे वागला.

पंतने ज्या प्रकारे आपल्या दोन्ही फलंदाजांना खेळ सोडून मैदानाबाहेर येण्याचे संकेत दिले, त्यामुळे संपूर्ण जगासमोर भारतीय क्रिकेटला लाज वाटली. जर तुम्ही आऊट दिला नाही तर आम्ही खेळणार नाही, जर तुम्ही नो-बॉल दिला नाही तर आम्ही बॅट घेऊन घरी जाऊ. रस्त्यावरील क्रिकेटमध्ये असे घडते. आयपीएलचे कर्णधार असताना पंत असे बेजबाबदारपणे वागू शकतो, तर ज्यावेळी टीम इंडियाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपवले, तर त्यानंतरची परिस्थिती किती भीषण होऊ शकते? याचा विचार न केलेला बरा.

ही फक्त एक बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे कर्णधारपदाच्या दबावाखाली पंतची कामगिरीही सातत्याने घसरत आहे. हंगामात खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने 33 च्या साध्या सरासरीने केवळ 234 धावा केल्या आहेत. परिणामी दिल्लीला फक्त चार सामने जिंकता आले. दिल्लीच्या चाहत्यांना खात्री होती की बॅटने धमाकेदार खेळी खेळून पंत प्रथम संघाला प्लेऑफमध्ये नेईल आणि नंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी जोरदार दावा सादर करेल. पण वेळ बदलली, भावना बदलल्या आणि परिस्थिती सुद्धा बदलली.

श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यास अपयशी

श्रेयस अय्यरबद्दल असं म्हटलं जातं की, जिद्द असणारेच पास होतात. दुखापतीमुळे तो दिल्लीचा कर्णधार होऊ शकला नाही, तेव्हा व्यवस्थापनाने पंतला नवा कर्णधार बनवले. तो पंतच्या नेतृत्वाखाली अर्धा हंगाम खेळला आणि त्याच वेळी श्रेयसला वाटले की दिल्ली त्याच्यासाठी खूप दूर आहे. त्याला लखनौ आणि गुजरातच्या नवीन फ्रँचायझींनी संघानी ऑफर दिली होती. मात्र श्रेयसने ते नाकराले कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत खेळायचे होते ते कर्णधार म्हणूनच.

कोलकाताने श्रेयसला मोठ्या अपेक्षेने विकत घेतले आणि कर्णधार पदही दिले ते मोठ्या अपक्षेनेच. मात्र संघाच्या कामगिरीसोबतच श्रेयसची स्वत:ची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे करु शकली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमसोबतचे त्याचे भांडण सतत चर्चेत राहिले. अलीकडेच भारतीय क्रिकेटमध्ये सुद्धा कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला हे आपण सर्वांनीच पाहिले. श्रेयस कर्णधार झाला तर त्याच्या आणि मॅक्क्युलमच्या बाबतीत जे काही घडतेय त्याचीच पुनरावृत्ती भारतीय प्रशिक्षकासोबत होणार नाही याची शाश्वती कोण देणार? श्रेयसबद्दलची हीच भीती त्याला भारताचा पुढचा कर्णधार होण्यापासून रोखू शकते.

प्रत्येक वेळी स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या श्रेयसने यावेळी 10 सामन्यांत 36 च्या सरासरीने 324 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही 133 वर घसरला आहे. 85 धावांची इनिंग खेळूनही तो सामना पूर्ण करू शकला नाही आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. श्रेयस त्याच्या कर्णधारपदाच्या काळात संघातील खेळाडू बाबत घेण्यात येणारे निर्णय, यामुळे कायम खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना स्पष्टपणे दिसून येते. आगामी काळात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड झाली, तर इथेही संघातील खेळाडूंचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हार्दिक पांड्याची शेवटच्या नंबरा पासून ते अव्वल नंबर कडे वाटचाल

ज्या खेळाडूची क्रिकेट कारकीर्द जवळपास संपली होती, तो खेळाडू आज भारताच्या नवीन कर्णधाराच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यापासून प्रथम फलंदाजी करण्यापर्यंत सर्व काही करू शकणारा खेळाडू. हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने NCA मध्ये हार्दिकची फिटनेस चाचणी घेतली. जर तो पास झाला नाही तर त्याला आयपीएल खेळू दिले जाणार नाही, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. ज्या गुजरातने हार्दिकला मोठ्या आशेने आपल्याशी जोडले होते, त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरताना दिसत होते. पण हार्दिकचा स्वतःवर विश्वास होता की मी करु शकतो आणि फक्त मीच करू शकतो.

हंगामाच्या सुरुवातीला विजयाची नोंद केल्यानंतर रॉकस्टार पंड्याने मागे वळून पाहिले नाही. एक कर्णधार जो आक्रमक आहे आणि आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभा आहे. संघाच्या यशाचे सर्व श्रेय युवा खेळाडूंना जाईल आणि आम्ही अपयशी ठरलो तर सर्व दोष माझाच असेल, असे हार्दिकचे विधान कोण विसरू शकेल. या विधानाने आश्चर्य व्यक्त केले. कर्णधार माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याने संघातील आमच्या स्थानाला कोणताही धोका नाही, याची खेळाडूंना खात्री पटली.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने 8 सामने खेळले, त्यापैकी 7 सामने त्याने जिंकले. यादरम्यान पांड्याच्या बॅटमधून 308 धावा झाल्या. तसेच त्याच्या नावावर 4 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकच्या दोन मोठ्या समस्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा फिटनेस आजही चाहत्यांना वेळोवेळी घाबरवत असतो. कधी तो सामन्यापूर्वी पाठीवर मसाज करताना दिसतो तर कधी सामन्यात ब्रेक घेताना दिसतो.

याशिवाय मोहम्मद शमीच्या संथ क्षेत्ररक्षणावरही त्याची आरडाओरड क्रिकेटप्रेमींच्या पसंतीस उतरली नाही. लोकांनी त्याच्यावर वरिष्ठ खेळाडूकडून गैरवर्तन केल्याचा आरोप केला. मात्र, दुसऱ्या एका घटनेत चेंडू वायरला लागल्याने हार्दिकने अंपायरसमोरच फलंदाजाला नाबाद घोषित केले. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की जर हार्दिकने आपला फिटनेस राखला आणि 145/kmph वेगाने गोलंदाजी केली तर कपिल देव प्रमाणे तो देखील टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो.

रवींद्र जडेजा खऱ्या आयुष्यात पुष्पा बनू नाही शकला

रवींद्र जडेजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. जडेजाने पुष्पा चित्रपटातील संवाद स्वतःच्या शैलीत रिक्रिएट करून लाखो चाहत्यांना खूश केले. पण पुष्पाप्रमाणे जडेजा हा खंबीरपणे उभा राहू शकला नाही, त्याला नतमस्तक व्हावे लागले. टीम इंडियासाठी सातत्याने मॅच-विनिंग कामगिरी करणाऱ्या सर जडेजावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली जेव्हा BCCI ने रोहित, बुमराह आणि विराट सारखे A+ ग्रेड दिले नाही. अशा परिस्थितीत सीएसके व्यवस्थापनाने धोनीचा उत्तराधिकारी म्हणून स्टार अष्टपैलू जडेजाची निवड केली. हंगाम सुरू होण्याच्या एक दिवस आधी अचानक घोषणा करण्यात आली.

रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई जुन्या यशाची पुनरावृत्ती करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण असं म्हणतात की काही लोक दबावापुढे चमकतात तर काही तुटून पडतात. संघात असताना जडेजा उघडपणे कर्णधाराची धुरा सांभाळताना दिसला नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनीनेच मैदानाच्या उभारणीपासून इतर सर्व गोष्टींमध्ये मदत केली, पण त्यानंतर धोनीने स्पष्ट केले की, तुम्ही कर्णधार असाल तर जबाबदारी ही तुमचीच आहे. आठ सामन्यांत कर्णधार असताना जडेजा आपल्या संघाला केवळ दोन सामन्यांत विजयापर्यंत नेऊ शकला. याचा परिणाम असा झाला की चॅम्पियन चेन्नई संघ गुणतालिकेत अव्वल असण्याऐवजी सर्वात शेवटी दिसू लागला.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून केवळ 113 धावा आल्या आणि नाबाद 26 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. एकेकाळी एका डावात 5 चौकार आणि 6 षटकार मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जडेजाने 8 डाव खेळून ही कामगिरी केली. दु:ख, वेदना, अपयश, वेदना आणि निराशेच्या गर्तेत बुडण्यापेक्षा जडेजाने कर्णधारपदाची धुरा सोडली. सर जडेजा आता क्वचितच टीम इंडियाचे कर्णधार करताना दिसेल

राहुलचा मजबूत दावा, रोहितनंतर होऊ शकतो कर्णधार

राहुल... तुम्ही नाव तर ऐकलेच असाल. जर तुम्ही ऐकले नसाल तर IPL च्या टॉप स्कोअरर्सची यादी पहा. 2018 पासून प्रत्येक हंगामात सुमारे 600 धावा करणारा KL राहुल हा एकमेव खेळाडू आहे. यावरुन कर्णधारपदाच्या दबावाखाली राहुलच्या स्वत:च्या कामगिरीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट होते. उलट तो अधिक जबाबदारीने खेळतो. मात्र, टीम इंडियाचे कर्णधार असताना पहिले चार सामने गमावणारा तो इतिहासातील एकमेव कर्णधार आहे. पण जे झाले, ते प्रकरण गेले, असे म्हणतात. या आयपीएल हंगामातील 10 सामन्यांमध्ये कर्णधार असताना राहुलने 7 वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतकांच्या जोरावर 451 धावा झाल्या आहेत. ५६ च्या सरासरीने धावा करणाऱ्या राहुलचा स्ट्राईक रेट 145 आहे. रोहित शर्मानंतर कर्णधाराचा शोध सुरू झाला, तर तो केएल राहुलवर मोठ्या प्रमाणावर संपुष्टात येऊ शकतो, असे म्हणणे पुरेसे आहे. पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

या संघाच्या यशाचे मुख्य श्रेय लखनऊ जोडलेले कोच गौतम गंभीर यांना जाते. आयुष बडोनी सारख्या युवा खेळाडूंना ओळखण्यापासून त्याच्यावर मेहनत करुन घेण्यापर्यंत, गौतम सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करुन घेताहेत. लखनऊ विरुद्ध अखेरच्या षटकात कुलदीप यादवने षटकार मारल्यानंतरही गौतमची आक्रमक प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल झाली. गौतम गंभीरच्या तालमीत काम केलेल्या राहुलला राहुल द्रविडसारख्या मेंटारखाली टीम इंडियासाठी केएल राहुल कसा कर्णधार बनतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...