आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्वाची धुरा:निकोलस पुरनकडे विंडीजचे नेतृत्व, वनडे, टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड

किंग्जस्टन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलार्डच्या निवृत्तीनंतर विंडीजच्या वनडे आणि टी-२० संघांच्या नेतृत्वाची धुरा निकोलस पुरनकडे सोपवण्यात आली. तसेच शाई होपची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. २६ वर्षीय पुरनने यापूर्वी २ वनडे आणि ८ टी-२० सामन्यांमध्ये विंडीज संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाने टी-२० फॉरमॅटमध्ये आठपैकी चार सामने जिंकले. पुरन हा विंडीजच्या वनडे टीमचा ३० वा आणि टी-२० टीमचा १२ वा कर्णधार ठरला आहे. गतवर्षी त्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...