आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Nine Mothers On The Court Of The US Open This Year; The Three Reached The Third Round

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेनिस:नऊ माता यंदा यूएस ओपनच्या कोर्टवर; तिघींनी गाठली तिसरी फेरी

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अझारेंका, पिरोनकोवा आणि सेरेनाचा सलग सेटमध्ये विजय

न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या टेनिस ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये यंदा ९ माता खेळण्यास उतरल्या. यातील तिघींनी तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. फ्लशिंग मिडोजवर अमेरिकन सेरेना विल्यम्स, बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका व बल्गेरियाची स्वेताना पिरोनकोवाने आपापल्या दुसऱ्या फेरीतील सामने सलग सेटमध्ये जिंकले.

दुसरीकडे, किम क्लिस्टर्स, वेरा ज्वोनारेवा, तात्याना मारिया, कॅटरिना बोंडारेंका, पॅट्रिसिया मारिया तिग व ओल्गा गोवोतर्गसोवा बाहेर झाल्या. माजी नंबर वन सेरेनाने रशियाच्या मार्गरिटा गेसपरयानला ६-२, ६-४ ने हरवले. सेरेनाने मुलगी अॅलेक्सिस ऑलिम्पिया आेहेनियनच्या तिसऱ्या जन्मदिनी म्हणजे १ सप्टेंबरला यूएस ओपनमध्ये सर्वाधिक १०२ सामने जिंकण्याचा विक्रम बनवला आहे. आता सेरेनाचा सामना आपल्या देशाच्या स्लोएन स्टीफन्सशी होईल. स्टीफन्सने गोवोतर्गसोवाला ६-२, ६-२ ने हरवले.

दुसरीकडे, अझारेंकाने बेलारूसच्या आर्यना सबालेंकाला ६-१, ६-३ ने हरवले. अझारेंकाला ४ वर्षांचा मुलगा लियो आहे. तीन वर्षांचा मुलगा असलेल्या पिरोनकोवाने स्पेनच्या मुगुरजाला ७-५, ६-३ ने हरवले.

दुसरा मानांकित थिएमची भारताच्या सुमीत नागलवर मात
ऑस्ट्रियाचा दुसरा मानांकित डोमिनिक थिएम व रशियाचा तिसरा मानांकित डॅनियल मेदवेदेव तिसऱ्या फेरीत पोहोचले. थिएमने भारताच्या सुमीत नागलला ६-३, ६-३, ६-२ ने हरवले. त्याचा सामना मारिन सिलीचशी होईल. मेदवेदेवने आॅस्ट्रेलियाच्या क्रिस्टोफर ओकोनेलला ६-३, ६-२, ६-४ ने मात दिली. कॅनडाच्या फेलिक्सने ब्रिटनच्या अँडी मरेला ६-२, ६-३, ६-४ ने पराभूत करत बाहेर केले.