आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:वनडेमध्ये आता सुपर ओव्हर नसावी : राॅस टेलरची मागणी, अंतिम सामना बरोबरीत राहिल्यास चषक विभागून

वेलिंगटनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जर वनडे विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत राहिल्यास, चषक विभागून द्यायला हवा. वनडेमध्ये सुपर ओव्हरची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रीया न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने दिली. गत वर्षी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हर झाली, ती देखील बरोबरीत राहिली. चौकार मोजून निर्णय झाला, ज्यात इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारले होते, त्यामुळे त्यांना विजयी घोषित केले. मात्र, त्यानंतर या नियमावर खूप टीका झाली. त्यानंतर आयसीसीला ते बदलावे लागले.

नव्या नियमानुसार, जर अंतिम व उपांत्य सामना बरोबरीत राहिला तर सुपर ओव्हर निकाल लागेपर्यंत चालू राहील. ‘मी अद्यापही वनडेत सुपर ओव्हरच्या नियमाशी सहमत नाही. मला वाटते, वनडे क्रिकेट मोठे आहे, त्यामुळे बरोबरीत सुटल्यावर कोणतीही अडचण नाही. टी-२० मध्ये ते योग्य आहे, मात्र वनडेत सुपर ओव्हरची गरज नाही, असेही टेलरने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...