आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटालियन ओपन टेनिस स्‍पर्धा:नंबर वन इगा स्वातेकची अझारेंकावर मात

रोम10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर वन इगा स्वातेकने एकतर्फी विजयासह गुरुवारी इटालियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने एकेरीच्या लढतीत माजी नंबर वन व्हिक्टाेरिया अझारेंकाचा पराभव केला. तिने ६-४, ६-१ अशा फरकाने एकतर्फी विजय साकारला.

आता गत चॅम्पियन स्वातेकचा अंतिम आठमधील सामना २०१९ यूएस चॅम्पियन बियांका आंद्रेस्कुशी होणार आहे. कॅनडाच्या अांद्रेस्कूने महिला एकेरीच्या सामन्यात क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिचला धूळ चारली. तिने ६-४, ६-० ने सामना जिंकला. यासह तिने अापली आगेकूच कायम ठेवली. बाडोसा व सबालेंकानेही शानदार विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...