आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्ल्यूटीए फायनल्स:नंबर वन इगा स्वातेकचा सलग तिसरा विजय; काेकाेचा पराभव

फाेर्ट वर्थएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूटीए फायनल्स : इगा स्वातेक ७० मिनिटांत विजयी

जगातील नंबर वन इगा स्वातेकने महिलांच्या डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धेत सलग तिसरा विजय नाेंदवला. तिने महिला एकेरीच्या सामन्यात रविवारी अमेरिकन युवा टेनिसपटू काेकाे ग्राॅफचा पराभव केला. तिने एक तास १० मिनिटे शर्थीची झंुज देत ६-३, ६-० ने सरळ दाेन सेटवर राेमहर्षक विजय साजरा केला. यातून तिला उपांत्य फेरी गाठता आली. यासह तिने सलग तिसरा सामना जिंकला. स्पर्धेत विजयी हॅट््ट्रिक साजरी करणारी स्वातेक ही पाचव्या मानांकित मारिया सक्कारीनंतर दुसरी टेनिसपटू ठरली. यासह तिलाही उपांत्य फेरीचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला आहे. स्वातेक आणि चाैथ्या मानांकित काेकाे यांच्यात आतापर्यंतचा हा पाचवा सामना हाेता. तिने काेकाेला सलग पाचव्या सामन्यातही धूळ चारली. आता स्वातेकचा उपांत्य फेरीतील सामना सातव्या मानांकित आर्यंना सबालेंकाशी हाेणार आहे. फ्रान्सच्या गार्सियाने एकेरीच्या सामन्यात आठव्या मानांकित दारिया कसात्किनावर मात केली. तिने ४-६, ६-१, ७-६ ने सामना जिंकला.

बातम्या आणखी आहेत...