आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Number One Novak Djokovic's Refusal To Clarify The Status Of Corona Vaccination

टेनिस:नंबर वन नोवाक योकोविकचा कोरोना लसीकरणाची स्थिती स्पष्ट करण्यास नकार; ऑस्ट्रेलियन ओपनला मुकावे लागण्याचे चित्र

मेलबर्न3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रँडस्लॅमची सुरुवात 17 जानेवारीपासून मेलबर्नमध्ये

ऑस्ट्रेलियन ओपनचा गत चॅम्पियन व जगातील नंबर-१ नोवाक योकोविकने आपल्या कोरोना लसीकरणाची स्थिती स्पष्ट करण्यास नकार दिला. २० वेळेचा ग्रँडस्लॅम विजेता सर्बियनने एका मुलाखतीत म्हटले की, तो त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्याच्या मते, तो ग्रँडस्लॅममध्ये खेळताना वैयक्तिक माहिती जाहीर करणार नाही.

लसीकरणाशिवाय खेळाडूंना ऑस्ट्रेलियात प्रवेशबंदी
व्हिक्टोरिया प्रीमियर डॅनियल अँड्यूजने म्हटले की, ‘लसीशिवाय टेनिसपटूला देशात येण्यासाठी व्हिसा मिळेल असे, मला वाटत नाही. जरी त्यांना व्हिसा मिळाला तरी त्यांना काही आठवडे क्वाॅरंटाइनमध्ये राहावे लागेल. तुमची टेनिस क्रमवारी काय आहे किंवा तुम्ही किती ग्रँडस्लॅम जिंकलात याची विषाणूला पर्वा नाही. हे पूर्णपणे अप्रासंगिक आहे. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला लसीकरण करणे आवश्यक आहे.’ पुढच्या वर्षी १८ जानेवारीपासून ही स्पर्धा रंगणार आहे.

नऊ वेळा विजेता योकोविक २ आठवड्यांत घेणार निर्णय
योकोविकने आतापर्यंत नऊ वेळा या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजववला आहे. त्यामुळे आता ताे या स्पर्धेतील सहभागाचा निर्णय लवकरच जाहीर करणार आहे. ‘मला या स्पर्धेसाठी पुढील सत्रात ऑस्ट्रेलियाला जायचे आहे, मी तेथे सर्वाधिक यश मिळवले आहे. मी ऑस्ट्रेलियातील परिस्थितीची माहिती घेत आहे. पुढील दोन आठवड्यांत त्याबाबत पुढील निर्णय घेईल, असे ताे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...