आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • ODI Series | India Number One; New Zealand's Thrashing At Home For The Third Time, Winning The Third Match By 90 Runs

वनडे मालिका:भारत नंबर वन; घरच्या मैदानावर तिसऱ्यांदा न्यूझीलंड संघाचा धुव्वा, 90 धावांनी जिंकला तिसरा सामना

इंदूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्णधार राेहित शर्मा, शुभमनची शतके

सामनावीर शार्दूल (३/४५) आणि मालिकावीर शुभमन गिलच्या (११२) शानदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने मंगळवारी न्यूझीलंड संघाविरुद्ध वनडे मालिकेत विजयी हॅट‌्ट्रिक साजरी केली. सलग तिसऱ्या विजयासह भारताने वनडे फाॅरमॅटमध्ये जगात नंबर वन संघ हाेण्याचा बहुमान पटकावला. भारताने शेवटच्या वनडेत न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या न्यूझीलंड टीमचा ३-० ने धुव्वा उडवला. भारताने तिसऱ्यांदा घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा खुर्दा पाडला. राेहित शर्मा (१०१) आणि शुभमन गिलच्या द्विशतकी भागिदारीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला विजयासाठी ३८६ धावांचे टार्गेट दिले हाेते. प्रत्युत्तरात दमछाक झालेल्या न्यूझीलंड टीमला ४१.२ षटकांत अवघ्या २९५ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंड संघाकडून सलामीवीर डेवाेन काॅन्वेने एकाकी झुंज देत १३८ धावांची माेठी खेळी केली. मात्र,इतर फलंदाजांच्या सुमार खेळीने न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून शार्दूल व कुलदीपने प्रत्येकी ३ बळी घेतले.

शुक्रवारपासून टी-२० मालिका
येत्या शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. या मालिकेतील सलामीचा सामना रांचीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २९ जानेवारी लखनऊ येथील मैदानावर हे दाेन्ही संघ दुसऱ्या सामन्यात समाेरासमाेर असतील. १ फेब्रुवारी राेजी अहमदाबादमध्ये तिसरा सामना हाेईल.

बातम्या आणखी आहेत...