आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान दक्षिण आफ्रिका संघाने घरच्या मैदानावर मालिका विजय साजरा केला. यासह दक्षिण आफ्रिका संघाने यंदा आॅक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान भारतात हाेणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला. आफ्रिका संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात हाॅलंडचा पराभव केला. आफ्रिका संघाने १४६ धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिका संघाने ३७० धावा काढल्या. प्रत्युत्तरात हाॅलंड संघाला २२४ धावांपर्यंत मजल मारता आली. आफ्रिका संघाकडून सामनावीर मार्करामने १७५ धावांची माेठी खेळी केली. यासह आफ्रिका संघाने ३ वनडे सामन्यांची मालिका २-० ने आपल्या नावे केली. दक्षिण आफ्रिकेच्या मालिका विजयाने आता विंडीज संघाचे थेट वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न भंगले. विंडीजला पात्रता फेरीतून वर्ल्डकपचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.