आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Okyo Para Olympic Games;Bhavinaben Patel Scripts History, Becomes First Indian Table Tennis Player

अर्धांगवायूचा पराभव करून बनली चॅम्पियन:एक वर्षाच्या वयात अर्धांगवायू झाला, संगणक शिकायला गेल्यानंतर टेबल टेनिस खेळण्याची संधी मिळाली, आता पॅरालिम्पिकमध्ये पदक निश्चित

टाेकियाे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय टेबल टेनिसपटू भविनाबेन पटेलने शुक्रवारी टाेकियाे पॅरालिम्पिक स्पर्धेत एेतिहासिक कामगिरीला गवसणी घातली. तिने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठून स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले. तिने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या पेरिचवर मात केली. यासह तिने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. यातून तिचे स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. अशा प्रकारे पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी भविनाबेन ही भारताची पहिली टेबल टेनिसपटू ठरली. तसेच पॅरा गेम्समध्ये पदक विजेती भविनाबेन ही भारताची दुसरी महिला खेळाडू आहे. भविनाबेन पटेल एक वर्षाची होती, तेव्हा ती चालण्याचा प्रयत्न करत असताना पडली, त्यावेळी तिला एका पायात अर्धांगवायू झाला, नंतर तिचा दुसरा पायही अर्धांगवायू झाल्यामुळे निकामी झाला.

भारतीय टेबल टेनिसपटू भविनाबने पटेलने इतिहास रचला. भविनाने महिला एकेरीत क्लास ४ प्रकारात प्री क्वाॅर्टर फायलनमध्ये ब्राझीलच्या जोएसे डी ओलिविएराला ३-० ने हरवले. ३४ वर्षीय भविनाने ओलिविएराला १२-१०, १३-११, ११-०६ ने मात दिली. तिने २३ मिनिटांत विजय मिळवला.

भविनाबेन तीन भावंडांमध्ये सर्वात लहान
भविनाबेनन पटेल गुजरातच्या वडनगरच्या सुंदिया गावातील रहिवासी आहे. तिचे वडील हसमुख भाई पटेल गावातच एक छोटे दुकान चालवतात. भविनाबेन तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. वडिलांनी दैनिक भास्करला सांगितले की, भविनाबेन पटेल यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे, दोघेही स्वस्थ आहेत. जेव्हा भविनाबेन एक वर्षांची होती, ती चालण्याचा प्रयत्न करत असताना कोसळली आणि एका पायात अर्धांगवायू झाला. नंतर दोन्ही पायांना अर्धांगवायू झाला. ऑपरेशननंतर तिने क्रॅचच्या मदतीने चालायला सुरुवात केली.

कॉम्प्युटर शिकत असताना प्रशिक्षकाचे लक्ष गेले
हसमुख भाई सांगतात की, भविनाबेन संस्कृत विषयात पदवीधर आहेत. जेव्हा ती दिव्यांग शाळेत संगणक शिकण्यासाठी जाऊ लागली, तेव्हा गुजरात पॅरा टेबल टेनिसचे प्रशिक्षकाचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यांनीच भविनाबेनला टेबल टेनिस खेळण्यासाठी प्रेरित केले. एकदा तिने व्हीलचेअर टेबल टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. टेबल टेनिसमुळे तिने आतापर्यंत 27 देशांचे दौरे केले आहेत. तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत.

लग्नानंतर पतीची पूर्ण साथ मिळाली
भविनाबेनला क्रीडा कोट्यातून कर्मचारी विमा महामंडळात नोकरी मिळाली आहे. तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर तिला तिच्या पतीचा पूर्ण पाठिंबा मिळाला. पती आणि सासरच्यांच्या पाठिंब्यामुळे ती लग्नानंतरही खेळ चालू ठेवू शकली. एवढेच नाही तर लग्नानंतर तिचा नवरा प्रत्येक स्पर्धेला सोबत करतो, जेणेकरून भविनाबेनला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. ते टोकियोमध्ये देखील एकत्र आहेत.

सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास
वडिल सांगतात, भविनाबेनकडून पदक जिंकण्याचा त्यांना आधीच आत्मविश्वास आहे. आतापर्यंत ती जिथे गेली तेथून पदक घेतल्याशिवाय परत आलेली नाही. त्यांना विश्वास आहे की सुवर्णपदक जिंकल्यानंतरच भविनाबेन टोकियोहून परत येईल.

बातम्या आणखी आहेत...