आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Olympic 2020 | Olympics Chief Thomas Bach Say 2021 'last Option' For Tokyo Games Due To Coronavirus COVID 19 In Japan News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा ऑलिम्पिकवर परिणाम:2021 मध्येही टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धा आयाेजनावर टांगती तलवार!

लुसानेएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • स्पर्धेचे आयाेजन न झाल्यास आम्ही रद्दची घाेषणा करू : बाक

काेराेना व्हायसरचा वाढता धाेका आता काही प्रमाणात आटाेक्यात येत आहे. त्यामुळे स्पाेर्ट्‌्स इव्हेंटलाही आता हळूहळू सुरुवात झाली आहे. मात्र, याच काळात टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयाेजनावर अद्यापही टांगती तलवार आहे. कारण काेराेनाच्या भीतीने आयाेजकांमध्ये अद्यापही निरुत्साही वातावरण आहे.

‘निश्चित वेळेत २०२१ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयाेजन झाले नाही तर, ही स्पर्धा रद्द हाेऊ शकते,’असेही संकेतही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयआेसी) अध्यक्ष थाॅमस बाक यांनी दिले. याशिवाय २०२१ मध्ये स्पर्धा आयाेजन हाच आता सर्वांसाठी शेवटचा पर्याय आहे, असेही आयआेसीने स्पष्ट केले. ाॅलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यास जपान संघटनेला जवळपास ४९०० काेटींचा फटका बसणार आहे. प्रेक्षकांविना आयाेजनासंबंधी आम्ही विचार करू शकत नाही. खेळाडूंच्या आराेग्याचा माेठा प्रश्न आहे. त्यामुळे यासाठीचा निर्णय आम्ही जागतिक आराेग्य संघटना आणि जपान शासनासाेबतच्या चर्चेनंतर घेऊ,असेही आयआेसीने सांगितले.

वादग्रस्त लाेगाे काढून टाकला

फाॅरेन करस्पाॅन्डेंट्स क्लब ऑफ जपानने (एफसीसीजे) हाऊस मॅगझिनमधील टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेचा वादग्रस्त लाेगाे काढून टाकला. क्लबचे अध्यक्ष खलदाेन अजहरीने यासंबंधी काॅपी राइट्सचची माहिती देत हा निर्णय घेतल्याचे सांगितले. या मासिकाने काेराेनाचा माेठा परिणाम झालेला असतानाचा २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचा लाेगाे पहिल्या पेजवर प्रकाशित केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...