आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:2008 मध्ये मैत्री, 7 वर्षे अबाेला; आता बाेहल्यावर!  अाॅलिम्पियन तिरंदाज दीपिकाकुमार व अतानू दास मंगळवारी हाेणार विवाहबद्ध

जयपूर ( संजीव गर्ग)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साध्या पद्धतीने साेहळ्याचे अायाेजन

छाेट्या कारणावरून झालेल्या वादातून दाेन वर्षांच्या मैत्रीमध्ये अचानक तब्बल सात वर्षांपर्यंत अबाेला आला. मात्र, याच दुराव्यातून प्रेमाचे अंकुर फुलले अाणि पुन्हा एकदा मैत्रीचे सूर जुळले ते नव्याने एकत्र संसार फुलवण्यासाठीच. चित्रपटातील कथानकाला साजेशी ही छाेटीशी लव्हस्टाेरी अाहे अाॅलिम्पियन तिरंदाज दीपिका कुमार अाणि अतानू दास यांची. येत्या मंगळवार, ३० जून राेजी हे दाेन्ही खेळाडू विवाहबद्ध हाेणार अाहेत. लाॅकडाऊन अाणि काेराेनाच्या भीतीमुळे रांची येथे अत्यंत साध्या अाणि माेजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाहसाेहळा पार पडणार अाहे. याबाबत तिरंदाज दीपिका कुमारीने दिव्य मराठीसाेबत संवाद साधला. तिच्याशी साधलेला हा खास संवाद.

लाॅकडाऊनमध्ये विवाहाचा निर्णय का?
सध्या महामारीच्या भीतीने सर्वांचे जीवन काहीसे थांबल्यासारखे अाहे. मात्र, सर्वच जण संघर्षातून हेच जीवन अानंददायी करण्यासाठी प्रयत्नशील अाहे. यातूनच अाम्हीही असाच विचार केला. टाेकियाे अाॅलिम्पिकलाही वर्षभराची स्थगिती अाहे. सराव अाणि प्रशिक्षणासाठीचे कॅम्पही स्थगित अाहेत. त्यामुळे अामचा हा साेहळा अानंददायी ठरेल.

दुराव्यानंतर कसे जुळले प्रेम :
मी अाणि अतानु दास २००८ मध्ये चांगल्या प्रकारे मित्र झालाे. त्यानंतर अामच्यातील दाेन वर्षांच्या मैत्रीत अचानक दुरावा निर्माण झाला. २०१० मधील किरकाेळ वादातून अाम्ही २०१७ पर्यंत अबाेला धरला. मात्र, याच दुराव्यातून मेक्सिकाे वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान मैत्री झाली अाणि मग प्रेमाचा अंकुर फुलला. यातून थेट अाम्ही २०१८ मध्ये लग्नाचा निर्णय घेतला.

अांतरजातीय विवाहाला मान्यता अाहे?
माझ्या घरी अद्यापही काहीसा विराेध अाहे. मात्र, अतानुच्या कुटुंबीयांनी माझा स्वीकार केला. अामच्या कुटुंबीयांना सध्या गावातील लाेक अाणि समाजाच्या भीतीचे दडपण अाहे. मात्र, मी याबाबत अाई-वडिलांशी संवाद साधला. त्यांना याची पुर्णपणे माहिती दिली. गावकऱ्यांचेही पाठबळ मला लाभेलच, अशी अाशा अाहे. त्यांचे सातत्याने मला पाठबळ असतेच. यातही मिळेल, असे वाटते.

लाॅकडाऊनमध्ये काय करतेय? पदकासाठीची अाशा कायम?
हाेय. माझ्याकडून साहजिकच चाहत्यांच्या पदकासंबंधीच्या माेठ्या अाशा अाहेत. याच पूर्तीसाठी मी सध्या कसून मेहनत घेत अाहे. त्यामुळे मला हा पल्ला अाता टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान गाठता येईल, असा विश्वास अाहे. सध्या मी लाॅकडाऊनमुळे घरीच सराव करत अाहे. याशिवाय मी घरी फावल्या वेळात किचनमध्येही पदार्थ बनवण्यासाठी प्रयत्न करत अाहे. मी बंगाली पदार्थ तयार करत अाहे. लग्नानंतर सध्या तरी अामचा कुठेही फिरायला जायचा प्लाॅन नाही. खेळामुळे अनेक वेळा विदेश दाैरे केले. जम्मू-काश्मीरचे निसर्गसाैदर्य पाहण्याची माझी इच्छा अाहे.

बातम्या आणखी आहेत...