आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Olympic Athletes Will Not Have To Stay In Isolation For 14 Days; Fan Decision: Organizer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोकियो:ऑलिम्पिकच्या खेळाडूंना 14 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार नाही; चाहत्यांचा निर्णय : आयोजक

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळाडूंना ७२ तासांत काेराेना टेस्ट करणे असेल सक्तीचे

टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी म्हटले की, स्पर्धेत सहभागी खेळाडूंना १४ दिवस आयसोेलेशनमध्ये राहणे अनिवार्य राहणार नाही. मात्र, जपानला पोहोचण्यापूर्वी खेळाडूंनी ७२ तासांत कोरोना चाचणी करणे आवश्यक राहील. त्यांनी म्हटले, अद्याप देशाबाहेरून येणाऱ्या चाहत्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, त्यांना १४ दिवस क्वॉरंटाइन ठेवणे शक्य नाही. टोकियो २०२० चे सीईओ तोशिरो मुतोने म्हटले, ‘खेळाडू, प्रशिक्षक आणि स्पर्धेच्या अधिकाऱ्यांना देशात प्रवेश देण्यात येईल. देशाबाहेरून येणाऱ्या चाहत्यांचा निर्णय त्या वेळची परिस्थिती पाहून घेतला जाईल.’ आम्ही देशातील आणि विदेशातील प्रेक्षकांसाठी नियोजन करत आहोत. १४ दिवसांचे क्वॉरंटाइन सध्या शक्य नाही. येथे येण्यापूर्वी आणि आल्यानंतर कोरोना चाचणी आवश्यक आहे. जपानने काही दिवसांपूर्वी काही प्रायोगिक स्पर्धेचे आयोजन केले होते. गत आठवड्यातील ४ देशांच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेचा समावेश होता. त्यात मर्यादित जपानी चाहत्यांना परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक पुढील आठवड्यात ३ दिवसांच्या जपान दौऱ्यावर येत आहेत. मुतोने म्हटले की, या वेळी कोरोनावर चर्चा होऊ शकते.

पुढील ऑलिम्पिकच्या आर्थिक ताळेबंदात १६ टक्के केली वाढ
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) संचालक मंडळाने ऑलिम्पिक २०२१-२४ च्या आर्थिक ताळेबंदीमध्ये १६ टक्के वाढ करण्याची तयारी दर्शवली. आता बजेट जवळपास ४४०० कोटी रुपये झाले. या वाढीचा उपयोग आयआेसी खेळाडू, राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि कॉन्टिनेंटल असोसिएशनच्या ऑलिम्पिक समितीस मदत करण्यासाठी होईल. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाकने म्हटले, ‘सध्या कोरोनाकाळात आपल्याला अधिक निधीची गरज आहे. त्यामुळे पुढील चार वर्षांसाठी बजेटमध्ये १६ टक्के वाढ केली आहे. खेळाडूंच्या उपक्रमात २५ टक्के निधीची वाढ केली.

बातम्या आणखी आहेत...