आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाेकियाे:ऑलिम्पिक अडचणीत; 51.7% स्थानिकांचा आयाेजनाला विराेध, संस्थांच्या सर्वेक्षणात चिंताजनक बाब उघड

टाेकियाे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑलिम्पिक स्पर्धा रद्दची स्थानिकांची मागणी जाेर धरून

अव्वल  खेळाडूंची नजर आता जागतिक दर्जाची स्पर्धा ऑलिम्पिक आयाेजनाकडे लागली आहे. यासाठीच हे खेळाडू घरीच प्रचंड मेहनत करत आहेत. काेराेनाच्या महामारीमुळे या स्पर्धेच्या आयाेजनाला वर्षभरासाठी स्थगिती देण्यात आली. मात्र, आता महामारीपेक्षाही एका वेगळ्याच संकटामुळे या स्पर्धेच्या आयाेजनावर टांगती तलवार आहे. येथील स्थानिक ५१.७ टक्के नागरिकांनी या स्पर्धेच्या आयाेजनाला प्रचंड विराेध दर्शवला आहे. २०२१ मधील ही स्पर्धा रद्द किंवा टाळण्यात यावी, अशी मागणी या स्थानिकांनी केली.  जपानमधील क्याेडाे न्यूज आणि टाेकियाे एमएक्स टेलिव्हिजनच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही चिंताजनक बाब समाेर आली आहे. महामारीमुळे  ही स्पर्धा वर्षभरासाठी स्थगित झाली.

27.7% नागरिकांची गेम्स रद्दला पसंती  

टाेकियाेतील ५१.७% पैकी २७.७ टक्के नागरिकांनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयाेजन रद्द व्हावे, असे मत मांडले. तर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयाेजनाला स्थगिती मिळावी, असे २४ टक्के नागरिकांचे मत आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा २३ जुलैपासून टाेकियाेमध्ये सुरू हाेईल.

बातम्या आणखी आहेत...