आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो:2021 मध्येही ऑलिम्पिकची आशा कमी; कोरोनामुळे पुन्हा आयाेजनावर सावट

3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 2021 मध्येही ऑलिम्पिकची आशा कमी

टोकियो ऑलिम्पिक कोरोना व्हायरसमुळे एका वर्षासाठी स्थगित करण्यात आले आहे. आता हे २०२१ मध्ये होईल. यादरम्यान आयोजन समितीने २०२१ मध्येदेखील या स्पर्धेच्या आयोजनावर शंका व्यक्त केली. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी कोरोना व्हायरसमुळे या आठवड्यात देशात आणीबाणी घोषित केली आहे. टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे सीईओ तोशिरो मुतो यांनी म्हटले की, माझ्या मते सध्या कोणीही सांगू शकत नाही की, व्हायरसवर पुढील वर्षीपर्यंत नियंत्रण मिळवू शकतो. 

आम्ही सध्या याबाबत योग्य उत्तर देण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी म्हटले की, आम्ही स्पर्धेला एका वर्षासाठी स्थगित केले आहे. अशात आम्हाला स्पर्धा आयोजनासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. मुतो म्हणाले, आम्ही केवळ कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्याकडे लक्ष देत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...