आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Olympic Medal In Athletics Is Not Easy, It Is Not Cricket That Only 5 7 Countries Play: Milkha Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:अॅथलेटिक्स खेळामध्ये ऑलिम्पिक पदक आव्हानात्मक, माेजके संघ खेळतात असे क्रिकेट नाही; टाेकियाेतही पदकाची आशा धूसर : मिल्खा

भाेपाळएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • मिल्खाचा गुरुमंत्र : अॅथलेटिक्समध्ये पदकासाठी प्रत्येक राज्यात अकादमी सुरू हाेणे गरजेचे

कृष्णकुमार पांडेय   

अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणे सोपे नसते. त्या खेळाडू व प्रशिक्षकामध्ये संयम, मेहनत आणि शिस्तीची गरज आहे. या खेळात पदक जिंकून देण्यासाठी देशातील वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन गांभीर्याने काम केले तरच परिणाम दिसून येईल. मला टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा नाही, असे फ्लाइंग शीख नावाने प्रसिद्ध असलेले जगविख्यात खेळाडू मिल्खा सिंग यांनी म्हटले. त्यांनी अॅथलेटिक्समध्ये पदकाबाबत म्हटले की, “हे इतके सोपे नाही. अॅथलेटिक्स ऑलिम्पिकमध्ये नंबर वन आहे. इतर खेळ त्याच्या मागे आहेत, ते कुस्ती असो किंवा नेमबाजी. हे क्रिकेट नाही, ज्यात केवळ ५-७ देशच खेळतात. ज्यात आज भारत जिंकला, तर उद्या पराभूत होईल. ऑलिम्पिकमध्ये २०० ते २२० देशांचे खेळाडू सहभागी होतात. स्वातंत्र्यानंतर काही खेळाडू फायनलपर्यंत पोहोचू शकले आहेत, जसे मी स्वत:, पी.टी. उषा, श्रीराम, गुरुवचनसिंग रंधावा, अंजू बॉबी जॉर्ज. आम्ही पदक जिंकू शकलो नाही. मात्र, फायनलमध्ये पोहोचणेदेखील सोपे नसते.’ 

अमेरिका, केनिया, जमेकाचे खेळाडू अंतिम रेषेच्या पहिलेच डाव पलटवतात : “मला नाही वाटत की, टोकियो ऑलिम्पिकच्या  शकेल. दूती चंद व हिमा दास निश्चित उत्कृष्ट खेळाडू आहेत. मात्र, त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या काही करू शकतात. अद्याप भारताला अॅथलेटिक्सचा दर्जा माहिती नाही. अमेरिका, केनिया, जमेका, ऑस्ट्रेलियाच्या महिला तुफान आहेत. त्या अंतिम रेषेच्या पूर्वीच डाव पलटवतात. त्यामुळे इतरांचे स्वप्न सहज भंग पावते. यासाठी तयारीची गरज आहे, असे ९० वर्षीय मिल्खा यांनी सांगितले.

विश्वविक्रमाचे टार्गेट समोर ठेवून सरावाची गरज; माेठा सल्ला

मी प्रशिक्षकांना जबाबदार धरणार नाही, कारण ते नेहमी माझ्याविरोधात असतात. माझ्या मते, पुलेला गोपीचंदने जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटू तयार केले आहेत. पी. टी. उषाचे प्रशिक्षक पितांबरमने तिला तयार केले. कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजीचे प्रशिक्षक ऑलिम्पिक पदक विजेता बनवू शकतात, तर अॅथलेटिक्स प्रशिक्षक का नाही? गरज आहे फक्त दृढ इच्छाशक्ती व कठीण परिश्रमाची.  प्रशिक्षक व खेळाडूंना गरजेपेक्षा अधिक गंभीर व्हावे लागेल. प्रत्येक खेळाडूने  विश्वविक्रम समोर ठेवून सराव करायला हवा. प्रशिक्षकाला विश्वविक्रम तोडण्याच्या दृष्टीने तयारी करायला हवी.’असेही ते म्हणाले.

पदकासाठीचा कानमंत्र 

- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी पाच संस्थांना गांभीर्याने मिळून काम करावे लागेल. ज्यात खेळाडू, प्रशिक्षक, भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशन, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचा समावेश आहे.    - जेव्हा सरकार पैसा, स्टेडियम, क्रीडा साहित्य व प्रशिक्षक उपलब्ध करून देत आहे, तर ऑलिम्पिक पदक का मिळत नाही हे त्यांना विचारले पाहिजे.

- शालेय राष्ट्रीय स्पर्धेतून खेळाडूंची गुणवत्ता शोधावी लागेल. कारण शालेय स्पर्धेत प्रत्येक वयोगटात गुणवत्ता पाहायला मिळते. निवड केलेल्या खेळाडूंना अकादमीत पाठवावे.

- सरकारला प्रत्येक राज्यात अॅथलेटिक्स अकादमी सुरू करावी लागेल. त्या अकादमीत मोठ्या वेतनावर (२ ते ३ लाख) प्रशिक्षकांची करार पद्धतीने नियुक्ती करावी. 

- प्रशिक्षकाला सांगावे, २ वर्षांत आशियाई आणि चार वर्षांत ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू पाहिजे. सोबतच त्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष्य ठेवावे. तेव्हा २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी असेल.

बातम्या आणखी आहेत...