आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Olympic Paralympic Games Tokyo LIVE News Update; Pramod Bhagat Badminton Shooting Suyash Jadhav Avani Lekhara; News And Live Updates

टोकियो पॅरालिम्पिक:नेमबाजीत मनीषने सुवर्ण तर सिंहराजने पटकावले रौप्य पदक, नोएडाचे डीएम सुहास आणि प्रमोद भगत बॅडमिंटन फायनलमध्ये

टोकियो13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रमोद सुवर्णपदकासाठी लढणार

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आज 11 व्या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली. नेमबाजीत एसएच -1 श्रेणीच्या 50 मीटर एअर पिस्तूलमध्ये मनीष नरवालने सुवर्णपदक तर सिंहराज अधानाने रौप्य पदक जिंकले आहे. तर दुसरीकडे, बॅडमिंटनच्या SL-4 मध्ये नोएडाचे डीएम सुहास यतीराज यांनीही अंतिम फेरी गाठली आहे. याआधी प्रमोद भगतने SL-3 मध्ये भारतासाठी किमान रौप्य पदकाची खात्री केली. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक पाठोपाठ पॅरालिम्पिकदेखील भारतासाठी चांगले ठरत आहे.

नेमबाजीच्या अंतिम फेरीत मनीषने 209 स्कोर केले. तर सिंहराजने 207 चा स्कोर करत भारतासाठी रौप्य पदक जिंकले. यापूर्वी अधाना 536 गुणांसह पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर होते. नरवालही 533 गुणांसह सातव्या स्थानावर होता. अधानाने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

प्रमोद सुवर्णपदकासाठी लढणार
भारतीय खेळाडू प्रमोद भगत सुवर्णपदकासाठी बेथेल डॅनियल्सशी भिडेल. बेथेलने उपांत्य फेरीत मनोज सरकारचा 21-8, 21-10 असा पराभव केला होता. मनोज सरकार आता कांस्यपदकासाठी फुजीहारा दाईसुकेचा सामना करेल. दोन्ही सामने दुपारी 3 वाजता खेळले जातील

रविवारी सुहास अंतिम फेरीत भिडेल
सुहास यथिराज एसएल-4 प्रकारात सुवर्णपदकासाठी मजूर लुकासशी लढणार आहे. हा अंतिम सामना रविवारी खेळला जाईल. तर दुसरीकडे, याच प्रकारात तरुण ढिल्लो कांस्यपदकासाठी इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतिआवानशी लढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...