आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो ऑलिम्पिक २०२० वर कोरोनाचे संकट सतत वाढत आहे. बुधवारी चिलीची तायक्वांदोपटू फर्नांडा एगुइरे आणि हॉलंडची स्केटबोर्डर केंडी जेकब्स, इंग्लंडची नेमबाज एंबर हिल, झेक गणराज्यची पॅडलर पावेल सिरुसेक आणि अमेरिकन बीच व्हाॅलीबॉलपटू टेलर क्रेब कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
टोकियो स्पर्धेत प्रथमच असे घडले, जेव्हा एखादा खेळाडू कोरोनामुळे टोकियोत पोहोचल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली. फर्नांडाचे प्रशिक्षक जोस जापाटाची चाचणी निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांना क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत ९ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, ज्यात ३ खेळाडू क्रीडाग्राममध्ये सापडले. बुधवारीदेखील फर्नांडो व जेकब्ससह १० रुग्ण आढळले.
आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचे ८२ रुग्ण सापडले आहेत. ज्यात खेळाडू, प्रशिक्षक, ऑफिशियल, विदेशी पाहुणे, स्वयंसेवकांचा समावेश आहे. जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले की, ‘कोरोना रोखण्यासाठी क्रीडाग्राममधील बनवलेले सुरक्षीत वातावरण केव्हाच संपुष्टात आले आहे.’
उद्घाटनात भारताचे हॉकी संघ सहभागी होणार नाही
कोरोनामुळे शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळा मर्यादित केला. भारताचे केवळ ६ अधिकारी स्पर्धेत सहभागी होवू शकतील. चीफ डी मिशन प्रेमकुमार वर्मा यांनी म्हटले की,‘प्रत्येक देशाचे ६ अधिकारी सहभागी होतील. मात्र, खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा नाही. मात्र, २४ जुलै रोजी ज्या खेळाडूंची स्पर्धा आहे, त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. सोहळा रात्री उशिरापर्यंत चालेल, त्यामुळे खेळाडूंना विश्रांती मिळणार नाही.’ भारताचे १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी होत असून ज्यात ऑफिशियल, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आहेत.
दुसऱ्या दिवशी नेमबाज, बॉक्सर, तिरंदाज व दोन्ही हॉकी संघ मैदानावर असतील. त्यांचा सहभागावर शंका आहे. भारताची ६ वेळेची जागतिक विजेता बॉक्सर एमसी मेरी कोम व हॉकी कर्णधार मनप्रीतसिंग ध्वजवाहक असतील. आयओएचे अध्यक्ष नरेंदर बत्रा सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. ते तीन दिवसाच्या बंधनकारक क्वारंटाइनमध्ये असतील.
ऑलिम्पिकदरम्यान संसर्गाचा धोका पूर्णपणे समाप्त करणे अशक्य : डब्ल्यूएचओ
जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस एडहानॉमने म्हटले की, टोकियो ऑलिम्पिकचे आकलन कोरोना रुग्ण संख्येनुसार करू नये. कारण, स्पर्धेदरम्यान संसर्गाचा धोका पूर्णपणे समाप्त करणे अशक्य आहे. त्यांनी म्हटले की, ‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे संसर्ग कसा हाताळला गेला. हे सुनिश्चित केले पाहिजे की, जर एखादा रुग्ण असेल, तर तो लवकरात लवकर ओळखला जावा आणि संक्रमित व्यक्तीला आयसोलेट केले जावे. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी होईल.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.