आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑलिम्पिक : कॅनडा, ऑस्ट्रेलियाची माघार; ऑलिम्पिक स्थगितीचे संकेत!

Tokyo6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • २०२१ साठी तयारी करा, ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंना आदेश
  • ऑलिम्पिक स्थगिती हा एक पर्याय; ४ आठवड्यंात ठाेस निर्णय : आयअाेसी

टोकियाे /माँट्रियल/सिडनी/लुसाने : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आता अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. यातून बळींच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ हाेत आहे. हाच प्रसाराचा धाेका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने सावध पवित्रा घेण्यात आला. यातून आता या दाेन्ही देशांनी टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतल्याची साेमवारी अधिकृत अशी घाेषणा केली अाहे. त्यामुळेच सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धा आयाेजनाला धक्का बसणारा निर्णय जाहीर झाला आहे. रविवारी अमेरिकेसह सहा देशांच्या आठ संघटनांनी या स्पर्धेच्या स्थगितीची मागणी केली हाेती. 
       
त्यामुळे आता यजमान जपानही अडचणीत सापडले आहे. जपानच्या पंतप्रधानांनी या स्पर्धेच्या स्थगितीचे संकेत दिले आहेत. याची अधिकृत घाेषणा चार आठवड्यांत परिस्थिती लक्षात घेऊन करणार असल्याची प्रतिक्रिया अांतरराष्ट्रीय अाॅलिम्पिक समितीने दिली. 

पुढच्या वर्षासाठीची तयारी करा सुरू : एअाेसी

आम्ही खेळाडूंना आता पुढच्या वर्षी २०२१ च्या दृष्टीने अाॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला अधिक जाेमाने सुरुवात करा, अशा सूचना केल्या असल्याची माहिती ऑस्ट्रेलिया ऑलिम्पिक संघटनेच्या (एअाेसी) वतीने देण्यात आली. स्पर्धेच्या आयाेजनाची परिस्थिती अद्यापही अवघड आहे. त्यामुळे माघार घेतली आहे, असेही सांगितले. 


परिस्थितीमुळे स्थगितीचा निर्णय हाेईल :  शिं
जाे 

जागतिक स्तरावर आता दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट आणि अवघड हाेत आहे. त्यामुळे आम्हाला नाइलाजाने अाॅलिम्पिक स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया जपानचे पंतप्रधान शिंजाे आबे यांनी दिली. त्यांनी ही स्पर्धा स्थगित करण्यासाठी जवळपास निश्चित असल्याचेही संकेत या वेळी दिले.

स्पर्धा रद्द धाेरणात नाही, स्थगिती हा पर्याय : बाक

कुठलीही जागतिक स्तरावरील स्पर्धा रद्द करणे, हे आमच्या  धाेरणात बसत नाही. त्यामुळे आम्ही स्थगितीच्या पर्यायाचीच निवड करताे, अशी प्रतिक्रिया अांतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयअाेसी) अध्यक्ष थाॅमस बाक यांनी दिली. आम्ही सध्याच्या परिस्थितीचा अाढावा घेऊ. चार आठवड्यांनंतर निर्णय घेणार, असेही बाक म्हणाले.

महिनाभरात परिस्थितीनुसार निर्णय; ताेपर्यंत वेट अँड वाॅच : राजीव मेहता

नवी दिल्ली: काेराेना व्हायरसच्या बाबतीत निर्माण झालेली परिस्थिती महिनाभरात कशी राहते, त्यानुसारच आम्ही ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाबाबतचा निर्णय घेणार आहाेत, अशी प्रतिक्रिया भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयअाेए) महासचिव राजीव मेहता यांनी दिली. त्यामुळे आता महिनाभर आम्ही वेट अँड वाॅच करणार आहाेत. आम्ही खेळाडूंना स्पर्धेच्या तयारीमध्ये खंड पडणार नाही, असेही सांगितल्याचेही या वेळी मेहता म्हणाले.  सर्वांची नजर परिस्थितीवर आहे.

अमेरिकेतील ७० टक्के खेळाडूंची ऑलिम्पिक स्थगितीला पसंती : सर्व्हे

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ७० टक्के खेळाडूंनी जपानमध्ये हाेणाऱ्या टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेच्या स्थगितीला पसंती आहे, अशी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समाेर आली आहे. हीच भूमिका लक्षात घेऊन रविवारी अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघटनेने जपानच्या आयाेजकांना स्पर्धा स्थगितीची मागणी केली. अमेरिकेतील वृत्तपत्राने याबाबतची एक प्रश्नावली प्रसिद्ध केली. याच्या माध्यमातून खेळाडूंनी आपले मत मांडले आहे. त्यामुळे फक्त ३० टक्के खेळाडू स्पर्धा आयाेजनाच्या बाजूने आहेत.

0