आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Neeraj Chopra Breaks Tokyo Olympics Record,National Record Set In Pao Noormi Games By Throwing 89.30m Javelin, Won Silver Medal

नीरज चोप्राने मोडला स्वतःचा ऑलिम्पिक रेकॉर्ड:नूरमी गेम्समध्ये 89.30 मीटर फेक करून बनवले राष्ट्रीय रेकॉर्ड, जिंकले रौप्य पदक

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा टोकियो गेम्सनंतर प्रथमच मैदानात उतरला. फिनलंडमध्ये झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये नीरजने 89.30 मीटर फेक करून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रीय विक्रम केला. मात्र, तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फिनलंडच्या ऑलिव्हर हेलेंडरने 89.83 मीटर फेक करून सुवर्ण आणि ग्रॅनडाच्या अँडरसन पिटर्सने 84.65 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. नीरज चोप्राने त्याच्या 87.58 मीटरच्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा केली, जो त्याने टोकियो ऑलिम्पिक दरम्यान साधला होता.

90 मीटर वर लक्ष्य

नीरजने यावर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे 90 मीटरचे अंतर पार करण्याचे लक्ष्य आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी 90 मीटरचे लक्ष्य गाठण्याचा तो प्रयत्न करत आहे, जेणेकरून जगातील अव्वल थ्रोवर्सच्या यादीत त्याचा समावेश करता येईल. नीरजला 15 ते 24 जुलै दरम्यान अमेरिकेत होणाऱ्या जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्याआधी, 30 जून रोजी, तो स्टॉकहोममध्ये उच्च-स्तरीय डायमंड लीग स्पर्धेत देखील भाग घेणार आहे. तो सध्या फिनलंडमधील कुओर्तने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात सराव करत असून 22 जूनपर्यंत तो तेथे असेल.

आता पुढचे लक्ष्य जागतिक चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे

आता नीरजचे पुढील लक्ष्य जागतिक अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याचे आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 15 ते 24 जुलै दरम्यान अमेरिकेत होणार आहे. त्याचवेळी, 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजने सांगितले की, देशासाठी राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे आपले पुढील लक्ष्य आहे.

बातम्या आणखी आहेत...