आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक 2036:सन 2036 च्या ऑलिम्पिकसाठी गुजरातची तयारी, यजमानपदाची सज्जता सुरू

विशाल पाटडिया | अहमदाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदाबाद-गांधीनगरात पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी

सन २०३२ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनस्थळाचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. मात्र त्याच्या आधीच गुजरातने सन २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अहमदाबाद-गांधीनगरात पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी आहे.

अहमदाबाद नगरविकास प्राधिकरणाने मंगळवारी ऑलिम्पिक निकषांनुरूप स्पाेर्ट‌्स व नॉन स्पोर्ट‌्स इन्फ्रास्ट्रक्चर गॅपच्या विश्लेषणासाठी निविदा जारी केल्या. हे काम मिळाल्यास संस्थेला ३ महिन्यांत अहवाल सादर करावा लागेल. २०२८ पर्यंतच्या ऑलिम्पिकचे यजमान ठरलेले आहेत. २०३२च्या यजमानपदासाठीची दावेदारी पुढील महिन्यात खुली होणार आहे.

२०२० ची ऑलिम्पिक कोरोनामुळे २०२१ मध्ये होणार आहे. २०२४ चे यजमानपद पॅरिसकडे, तर २०२८ ची स्पर्धा लॉस एंजलिसमध्ये होईल. २०३२ साठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ब्रिस्बेनला प्राधान्य दिले आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...