आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • On The First Day, We Started Talking About The Rights Of The Indian Subcontinent

आयपीएल प्रसारण हक्क बोली:पहिल्या दिवशी लागली भारतीय उपमहाद्वीपच्या राइट्सवर बोली

मुंबई | चंद्रेश नारायणन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या आगामी पाच वर्षांच्या प्रसारण हक्काच्या ई-आॅक्शनला रविवारपासून सुरुवात झाली. आज साेमवारी लीगची प्रसारण हक्काची सी कंपनी निश्चित हाेणार आहे. आता पहिल्याच दिवशी २०२३ ते २०२७ पर्यंतच्या आयपीएल प्रसारण हक्काच्या लिलावादरम्यान भारतीय उपमहाद्वीपच्या राइट्ससाठी बोली लावण्यात आली. सकाळी ११ वाजता या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

यासाठी टाटा स्टील आणि सेलने खास ई-लिलाव प्लॅटफाॅर्म तयार केला. त्यामुळे ही प्रक्रिया अधिकच साेपी झाली. या टेक्निकमुळे काेणतीही कंपनी जगाच्या कानाकाेपऱ्यातून या प्रक्रियेत सहभागी हाेऊन बोली लावू शकेल. या बोलीचा आकडा हा फक्त बीसीसीआयलाच दिसणार आहे. कंपनीकडे पहिली बोली लावल्यानंतर जवळपास ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला. स्टारने गत २०१८ ते २०२२ पर्यंतच्या प्रसारण हक्कासाठी जवळपास १६,३४७.५० काेटी रुपये माेजले हाेते. अॅमेझाॅन प्राइज व्हिडिआेला आयपीएलच्या डिजिटल राइट्ससाठीची सर्वात माेठी बोली लावणारी कंपनी मानली जात हाेती. मात्र, अॅमेझाॅनने या डिजिटल प्रसारण हक्कामध्ये फायदा नसल्याचे स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...