आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेच्या ६५ महाविद्यालयीन फुटबॉल उपक्रमांत केवळ १३ मुख्य प्रशिक्षक कृष्णवर्णीय आहेत. दुसरीकडे, कृष्णवर्णीय खेळाडूंची सरासरी ६० टक्के आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक माइक लॉकस्ले कृष्णवर्णीय प्रशिक्षकांचा सहभाग वाढवण्यासाठी काम करत आहेत. ५० वर्षीय लॉकस्लेने अल्पसंख्याक फुटबॉल प्रशिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रीय संघटना बनवली. कारण, त्या माध्यमातून अधिक कृष्णवर्णीय प्रशिक्षक तयार करता येईल, त्यांना प्रोत्साहन देता येईल. त्यासाठी त्यांनी आपल्यासोबत युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाच्या फुटबॉल टीमचे मुख्य प्रशिक्षक निक सबान, नॅशनल फुटबॉल लीगची टीम व सुपर बॉल चॅम्पियन पीटर्सबर्ग स्टीलर्सचे प्रशिक्षक माइक टोमलिनला सोबत घेतले.
लॉकस्ले म्हणतात की, “मला नेहमी अल्पसंख्याक प्रशिक्षकांबाबत विचारणा करणारे दूरध्वनी येतात. मी महाविद्यालयीन फुटबॉलमध्ये समानता आणू इच्छितो, त्यासाठी काम करतोय.’ महाविद्यालयीन फुटबॉल इतर व्यवसायांप्रमाणे आहे. येथे तुम्ही कोणाला व किती ओळखता त्यानुसार नोकरी मिळते. लॉकस्ले म्हणतात, अल्पसंख्याक प्रशिक्षक स्वत:ला सामाजिक गोष्टीतून बाहेर असल्याचे मानतात. त्यामुळे हा उपक्रम त्यांना नेतृत्व करण्यासाठी मदत करेल.
लॉकस्लेची योजना :
उमेदवाराची निवड करणे, त्याला मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे. त्याचबरोबर त्यांना विरोधी संघ, त्यांचे चाहते व माध्यमांना कशा प्रकारे हाताळायचे यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या सर्व गोष्टी शिकल्यानंतर त्यांची फुटबॉल अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली जाईल व प्रथम दर्जाचे प्रशिक्षक किंवा फुटबॉल संचालक बनण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
३२ पैकी ४ जणांचे मुख्य प्रशिक्षक कृष्णवर्णीय
नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) कृष्णवर्णीय किंवा अल्पसंख्याक प्रशिक्षकांना मुख्य प्रशिक्षकपद देण्यात यशस्वी ठरली नाही. रुनी रुल, ज्यांनी गेल्या १७ वर्षांत कृष्णवर्णीय उमेदवारांना प्रशिक्षकाची नोकरी देण्यासाठी मुलाखत आदींची व्यवस्था केली आहे. त्यानंतरही एनएफएलच्या ३२ फ्रँचायझींपैकी केवळ ४ मुख्य प्रशिक्षक कृष्णवर्णीय आहेत.
महाविद्यालयीन फुटबॉल ३६ हजार कोटींचे
अमेरिकन महाविद्यालयीन फुटबॉलमध्ये सर्वाधिक प्रशासक श्वेत आहेत, दुसरीकडे ६५ संघांत सर्वाधिक खेळाडू कृष्णवर्णीय आहेत. इंडियाना विद्यापीठात अर्थ विभागाचे सहायक प्राध्यापक रेयान ब्रुअरनुसार, महाविद्यालय फुटबॉलने २०१८ मध्ये ४.८६ बिलियन डॉलर (जवळपास ३६ हजार कोटी रु.) उत्पन्न मिळवून दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.