आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेल्या किलियन एमबापेच्या गत चॅम्पियन फ्रान्स संघाने बुधवारी मध्यरात्री अल बेत स्टेडियमवर फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची फायनल गाठली. फ्रान्स संघाने उपांत्य सामन्यामध्ये माेराेक्काे टीमला धूळ चारली. फ्रान्स संघाने २-० ने अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन करत फायनलमधील प्रवेश निश्चित केला. पराभवामुळे आता माेराेक्काे संघाला तिसऱ्या स्थानासाठी झुंज द्यावी लागणार आहे. माेराेक्काे आणि गत उपविजेता क्राेएशिया संघ १७ डिसेंबर राेजी समाेरासमाेर असतील.
उपांत्य सामन्यादरम्यान अल बेत स्टेडियमवर माेराेक्काे आणि फ्रान्स संघांच्या चाहत्यांनी माेठ्या प्रमाणात जल्लाेष करत आपापल्या टीमला पाठबळ दिले. मात्र, यादरम्यान माेराेक्काे संघाच्या चाहत्यांच्या पदरात निराशा पडली. चमत्कारीक खेळीने माेराेक्काे संघाला उपांत्य फेरीचा पल्ला गाठता आला. यातूनच या संघाला जगभरातील फुटबाॅलप्रेमींचे पाठबळ लाभत गेले. यातूनच उपांत्य सामन्यादरम्यानही माेठ्या संख्येतील चाहते शेवटपर्यंत माेराेक्काेला पाठबळ देत हाेते. सर्वाेत्तम खेळीच्या बळावर माेराेक्काे संघाने आपल्या नावे विक्रमाची नाेंद केली. बाेनाेऊच्या सर्वाेत्तम खेळीतून या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. आता फ्रेंच टीमच्याने फ्रान्समध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. कतार ते पॅरिसपर्यंत चाहत्यांनी विजयाचा जल्लाेष केला.
सलामीला दुखापतीमुळे लुकास हर्नांडेजला विश्रांती; लहान भाऊ थियाेला मिळाली संधी सध्या गत चॅम्पियन फ्रान्स संघ जायबंदी खेळाडूंमुळे काही प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. टीममधील आघाडीचे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले. यामध्ये एनगाेलाे कान्टे, पाॅल पाेग्बा आणि करीम बेंझेमाचा समावेश आहे. लुकास हर्नांडेजलाही सलामी सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली हाेती. त्याच्या जागी थियाेला संधी मिळाली. त्यानेही सर्वाेत्तम खेळी केली. थियाे हा लुकासचा लहान भाऊ आहे. ताे एसी मिलान क्लबकडून खेळताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.