आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेनचा सुपरस्टार टेनिसपटू राफेल नदालने त्याच्या 36व्या वाढदिवसाच्या दिवशी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हशी झाला होता. दुसऱ्या सेटमध्ये जर्मन खेळाडूला दुखापत झाली आणि त्यामुळे नदालला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले. त्यावेळी नदाल 7-6, 6-6 ने आघाडीवर होता.
नदालने कारकिर्दीत 14व्यांदा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 13 वेळा तो अंतिम फेरीत पोहोचला होता, तर प्रत्येक वेळी तो चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला होता.
ज्वेरेव्हला चालताही येत नव्हते
नदालने सामन्यातील पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. दुसरा सेटही 6-6 अशा बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरमध्ये गेला. यातच ज्वेरेव्ह शॉट खेळण्याच्या प्रयत्नात पडला आणि त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यांना व्हील चेअरवर बसवून मैदाना बाहेर नेण्यात आले. काही वेळाने तो कुबड्याच्या साह्याने मैदानात परत आला. त्यानंतर ज्वेरेव्ह पुढे खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि त्यावेळी नदालला विजेता घोषित करण्यात आले.
सिलिच आणि रूड यांच्यातील सामन्यातील विजेत्याकडून अंतिम
पुरुष एकेरीचा दुसरा उपांत्य सामना मारिन सिलिच आणि कॅस्पर रुड यांच्यात होणार आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत नदालची लढत याच सामन्यातील विजेत्याशी होईल.
नदाल कारकिर्दीतील 30वा ग्रँडस्लॅम फायनल खेळणार
राफेल नदालने 19 वर्षांच्या कारकिर्दीत 30व्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्या नावावर 21 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत जी जगातील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहेत. टेनिसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपनला ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणतात. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांनी आतापर्यंत 20-20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.