आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Opportunity For Players Up To 18 Years For The First Time In Play India; News And Live Updates

खेलो इंडिया:खेलो इंडियामध्ये प्रथमच 18 वर्षांपर्यंतच्या खेळाडूंना संधी; युवा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाला, नोव्हेंबरमध्ये स्पर्धा

चंदीगड/रायपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे गतवर्षी स्पर्धा रद्द करण्यात आली होती

हरियाणामध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या चौथ्या सत्राची जोरदार तयारी सुरू आहे. चौथे सत्र २१ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि ३० नोव्हेंबर रोजी समारोप होईल. स्पर्धेतील सामने हरियाणातील पंचकुला, अंबाला, शाहबादसह चंदीगड व दिल्लीमध्ये खेळवले जातील. यात देशभरातील जवळपास १० हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होतील. आतापर्यंत युवा स्पर्धेत १७ वर्षांखालील खेळाडू सहभागी होत होते. मात्र, प्रथमच १८ वर्षांखालील खेळाडूदेखील सहभागी होतील.

स्पर्धा सुरुवातीला ३ सत्रात आणि दोन वयोगटात खेळवली जाईल. २५ वर्षांखालील गटाची वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. १८ वर्षांवरील जवळपास खेळाडू खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होतील. या वर्षीपासून खेलो इंडिया युवा स्पर्धेत एका गटात आयोजित करण्यात येणार आहे. स्वदेशी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा स्पर्धेत प्रथमच ५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

एका दिवसात ५ हजार खेळाडूंचे आगमन
क्रीडा संचालक पंकज नैन यांनी म्हटले की, युवा स्पर्धेत जवळपास १० हजार खेळाडू व अधिकारी येणार आहे. खेळाडू येत-जात असतील. एका दिवसात कमीत कमी ५ हजार खेळाडू-अधिकारी येतील. आतापर्यंत खेळाडू एकत्र खोलीत राहत व अधिकारी एका खोलीत. मात्र, कोरोनामुळे यंदा प्रथम आम्ही खेळाडूंना वेगवेगळ्या खोलीत राहण्याची व्यवस्था करू शकतो.

यंदा पाच स्वदेशी खेळांचा समावेश
1. थांग-ता
: हा मणिपूरमधील प्रसिद्ध मार्शल आर्ट खेळ प्रकार आहे. ज्यात तलवार, भाला व ढालीचा उपयोग होतो. या खेळाला मान्यता आहे.
2. गटका : हा प्रकार भारतीय मार्शल आर्ट म्हणून ओळखला जातो. ही शीख समुदायाची पारंपरिक युद्धकला आहे.
3. कलरिपट्टू : हा एक प्रकारचा मार्शल आर्ट आहे, ज्याची सुरुवात केरळमधून झाली आहे. हा जगातील सर्वात जुना मार्शल आर्ट प्रकार आहे.
4. योगासन : या खेळाला गत सरकारने मान्यता दिली आहे. २१ जूनला योग दिनही साजरा केला जातो.
5. मल्लखांब : मल्लखांब हा प्राचीन खेळ असून ज्यात लाकडी खांबावर किंवा दोरीवर ताकदीचा उपयोग करत व्यायाम करतात.

युवा स्पर्धेत २० खेळ
अॅथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग, आर्चरी, ज्युदो, बॅडमिंटन, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, नेमबाजी, कुस्ती, टेटे, टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, सायकलिंग, हॅडबॉल.

बातम्या आणखी आहेत...