आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Opportunity To Challenge World Champion Viswanathan Anand With A Donation Of Just Rs 11,000

दिव्य मराठी विशेष:अवघ्या 11 हजारांच्या देणगीतून विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला आव्हान देण्याची संधी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेकमेट कोविड : विश्वनाथन आनंदसह चौघे खेळणार प्रदर्शनीय सामना
  • कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी वेगळी मोहीम; आंरराष्ट्रीय खेळाडू सहभागी

अाता २००० पेक्षा कमी फिडे रेटिंग असलेल्या बुद्धिबळपटूंना पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन अानंदला अाॅनलाइन सामन्यात अाव्हान देण्याची संधी अाहे. यासाठी १५० डाॅलर म्हणजेच फक्त ११ हजार रुपयांची देणगी द्यावी लागणार अाहे. चेस डाॅटकाॅम वेबसाइटवर हे सामने हाेतील. यादरम्यान जमा हाेणारी देणगी ही देशातील काेराेना बाधित खेळाडूंच्या उपचार व मदतीसाठी दिली जाणार अाहे. काेराेनाबाधित बुद्धिबळपटूंच्या अार्थिक मदतीसाठी महासंघाच्या वतीने नुकतीच चेकमेट काेविड ही मोहीम हाती घेण्यात अाली. याच मोहिमेतून बाधित खेळाडूंना अार्थिक मदत पुरवण्यात येते. यात अार्थिक निधी जमा करण्यासाठी अाता पाच वेळचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन अानंद हा प्रदर्शनीय सामना खेळणार अाहे. या वेळी त्याच्यासाेबत चार इतरही बुद्धिबळपटूही अाहेत.

आतापर्यंत या मोहिमेतून चार ते पाच खेळाडूंना अार्थिक मदत करण्यात अाली अाहे. यासाठी विश्वनाथन आनंदने स्वत: अार्थिक मदत केली. भारतामध्ये सध्या माेठ्या संख्येत काेराेनाबाधित रुग्ण अाहेत. यामध्ये खेळाडूंनाही याची लागण झाली अाहे. यातील बुद्धिबळपटूंना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी अाता महासंघाने पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...