आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायक्लॉथॉन स्पर्धा:खुल्या मास्टर्स सायक्लॉथॉनचे आयोजन

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायकलिंग असोसिएशन ऑफ औरंगाबादतर्फे खुल्या मास्टर्स सायक्लॉथॉन स्पर्धेचे २ ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्गावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ४०, ४५, ५०, ५५, ६०, ६५ व ७० वर्षांखालील महिला-पुरुष गटात ही स्पर्धा होईल. पुरुषांसाठी ३० किमी व महिलांसाठी १५ किमी स्पर्धेचे अंतर असेल.

प्रत्येक गटातील पहिल्या तीन खेळाडूंना चषक, पदक व प्रमाणपत्र दिले जाईल. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाईल. इच्छुक खेळाडूंनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी भिकन अंबे यांच्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...